Breking News
गॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावाडिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट आणि परिणामकारक पर्यायभिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणारनिर्यातीच्या आमिषाने ४ कोटी ३२ लाखांची फसवणूकपुण्यात कौटुंबिक वादातून सुनेकडून सासूचा खूनप्रेमविवाह केल्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वारस्वारगेट परिसरातील बेकायदा धंद्यांवर गुन्हे शाखेचा छापागुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून जेष्ठाची फसवणूकऊसतोड कामगारांसाठीच्या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

सोशल मीडियावरील ओळख महागात; १३ लाखांची फसवणूक

सीबीआय अन पोलिसांच्या नावाखाली तोतयांचा डाव

सायबर चोरट्यांकडून महिलांची १३ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – सोशल मीडियावरील ओळख दोन महिलांना महागात पडली. परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांची १२ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली. हडपसर भागातील हांडेवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेची सायबर चोरट्यांनी ७ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

हडपसरमध्ये मसाज पार्लरवर छापा – सविस्तर बातमी

तक्रारदार महिलेची समाज माध्यमातून सायबर चोरट्याशी ओळख झाली होती. चोरट्यांनी इंडोनेशियातून बोलत असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर चोरट्याने महिलेला भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखविले. भेटवस्तू पाठविल्या असून सीमाशुल्क विभागाने (कस्टम) जप्त केल्या आहेत, असे सांगून महिलेला तातडीने एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने चोरट्याच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्याने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत विवाहाच्या आमिषाने सायबर चोरट्याने एका महिलेची पाच लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, तक्रारदार ३५ वर्षीय महिला वाघोली भागात राहायला आहे. समाज माध्यमातून महिलेची सायबर चोरट्याशी ओळख झाली. विवाहाचे आमिष दाखवून चोरट्याने महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून महिलेकडून पाच लाख ७० हजार रुपये घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करत आहेत .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×