बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे
marathinews24.com
बारामती – बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी पालन करावे; परिसरात बिबट दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे यांनी केले आहे.
बाह्यवळण मार्गावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी
मौजे खांडज परिसर हा निरा डावा कालवा ते निरा नदी दरम्यान बागायत पट्टा असून मोठ्या प्रमाणात
दाट उसशेतीचा परिसर आहे. त्यामुळे या भागात गेल्या वर्षभरात खांडज, शिरवली व माळेगाव बु.च्या काही भागात बिबटचा वावर असल्याचे दिसून आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव पशुधन मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
या परिसरात बिबट्याचा पुन्हा वावर दिसून आल्याने वस्तीवरील शेतकरी, ग्रामस्थ व मजूरवर्ग यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे कळताच प्रादेशिक वन विभागाच्यावतीने तात्काळ बिबट प्रवण परिसरात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह रेसक्यू पथक, वनपाल, वनरक्षक मिळून नियमित रात्रगस्त, पाहणी दौरा करण्यात आहे. परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिबट जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहे. बिबट प्रवण परिसरात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
बिबट दिसल्यास नागरिकानी घाबरू नये, नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग करू नये; विशेषतः लहान मुले स्त्रिया व मजूरांनी आपली व आपल्या कुटुंबियाची काळजी घ्यावी, वन विभागाच्या ९६५७८८०८८८, ७३८७७७१०५० दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती शिंदे यांनी केले आहे.





















