Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

बाह्यवळण मार्गावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – विवाह समारंभाहून परतत असताना भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला.

खडकी बाजारात दोघांवर गोळीबार – सविस्तर बातमी

देवी हनुमंत सबावट (वय ३५, रा. लुल्लानगर, वानवडी) असे मृत्युुमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार महेश हनुमंत खटरावत (वय २७, सध्या रा. महमदवाडी, हडपसर, मूळ रा. हनवाडा, मेहबूबनगर, तेलंगणा ) जखमी झाला आहे. याबाबत खटरावत याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश खटरावत आणि त्याची मावशी देवी सबावट हे १४ मे रोजी खेड शिवापूर येथे एका विवाह समारंभासाठी गेले होते. तेथून ते रात्री दहाच्य सुमारास परतत होते. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार खटरावत आणि त्याची मावशी सबावट हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या सबावट हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाचा शाोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.

काेंढवा पोलीस ठाण्यातून आरोपी पसार

पुणे-चौकशी सुरू असताना कोंढवा पोलीस ठाण्यातून आरोपी पसार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पसार झालेल्या आरोपीविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दानिश याकुब सय्यद (वय २४, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार तानाजी सरडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दानिश याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. चौकशीसाठी त्याला कोंढवा पोलीस ठाण्यात आले होते. शुक्रवारी (१५ मे) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास त्याची चौकशी करण्यात येत होती. त्या वेळी आरोपी दानिश हा तपास पथकातील कक्षातून पोलिसांची नजर चुकवून पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×