Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

खडकी बाजारात दोघांवर गोळीबार

शिवीगाळ केल्याने झाडल्या गोळ्या, जीम मालक जखमी

खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पूर्ववैमनस्यातून दोघांवर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना खडकी बाजार परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडली. आरोपींनी पिस्तूल उगारून परिसरात दहशत माजविली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी नवी मुंबईतून अटकेत – सविस्तर बातमी

याप्रकरणी सुदर्शन अडसूळ (वय २५, रा. गवळवाडा, खडकी बाजार), तसेच साथीदार रचिन्मय (वय २५) यांना अटक करण्यात आली. आकाश संजय वाघमारे (वय २४, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ,महादेववाडी, खडकी) याने याबाबत खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे आणि आरोपींमध्ये वाद झाले होते. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी आणि साथीदार फिर्यादीवर दबाब आणून त्याला धमकावत होते. शुक्रवारी (१५ मे) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास वाघमारे आणि त्याचा मित्र दुचाकीवरुन खडकीतील राजीव गांधीनगर परिसरात आले. त्यावेळी आरोपी अडसूळ आणि त्याचा साथीदार चिन्मय तेथे आले. आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. ‘वाघमारे आणि त्याचा मित्र हे चांदणे टोळीतील आहेत. या दोघांना गोळ्या घाल’, असे सांगून अडसूळने चिन्मयच्या कंबरेत खोचलेले पिस्तूल बाहेर काढले. वाघमारे आणि त्याच्या मित्रावर पिस्तूल रोखले. पिस्तुलाचा चाप ओढून गोळी झाडली, असे वाघमारेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपींनी पिस्तूल उगारून दहशत माजविले. ‘सगळ्यांचा हिशेब चुकता करू’अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींना रात्री उशीरा अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×