कामगार दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – घर कामासाठी ठेवलेल्या दाम्पत्याने बंगल्यातून २७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. या प्रकरणी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कृष्णकुमार चंद (वय २५), त्याची पत्नी सीता (वय २३) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्यआद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल केलेले दाम्पत्य मूळचे नेपाळमधील आहे. फिर्यादी ज्येष्ठ महिला आणि कुटुंबीय कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील आनंदतीर्थ सोसायटीतील बंगल्यात राहायला आहेत. आरोपी दाम्पत्याने ज्येष्ठ महिला आणि कुटुंबीयांचे लक्ष नसल्याची संधी साधून शयनगृहातील कपाटातून रोकड, तसेच दागिने असा २७ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पसार झालेल्या दाम्पत्याचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक पठाण तपास करत आहेत.
येवलेवाडी परिसरात चिमुरडीवर अत्याचार; नातेवाईक आरोपी अटकेत – सविस्तर बातमी
प्रवासी महिलेच्या पिशवीतून १५ लाखांचे दागिने चोरी
पुणे-प्रवासी महिलेच्या पिशवीतून १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल केला.
याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४६ वर्षीय ज्येष्ठ महिला या खराडी भागात राहायला आहेत. त्या कर्नाटकात विवाह समांभासाठी गेल्या होत्या. महिलेने पिशवीत हिरेजडीत सोन्याचे दागिने ठेवले हाेते. कर्नाटकातून त्या आराम बसने पुण्याकडे परतत होत्या. शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्या हडपसर येथील थांब्यावर उतरल्या. तेव्हा पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस अलो. पोलीस उपनिरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.



















