Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात एकाच दिवसांत दोन खूनाच्या घटनांनी खळबळ

जुन्या वादातून तरुणावर हत्याराने जीवघेणा हल्ला

काशेवाडी, वडगाव बुद्रूकमध्ये खून

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले असतानाच, खूनाच्या घटनांचा आलेखही कमी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील १५ दिवसांत तब्बल ५ खून झाल्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचार्‍यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. खूनाच्या घटनांमुळे महिला,जेष्ठ नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अशाच दोन घटना काशेवाडी आणि वडगाव बुद्रूकमध्ये घडल्या आहेत. याप्रकरणी खडक आण् सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू – सविस्तर बातमी

दारू पिउन शिवीगाळ करीत असलेल्या वडिलांवर मुलीने चाकू चालवून खून केल्याची धक्कादायक घटना १७ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास काशेवाडी पोलीस चौकीजवळ घडली आहे. जैनुद्दीन दस्तगीर फुलारी (वय ७० रा. काशेवाडी) असे खून केलेल्या वडिलाचे नाव आहे. याप्रकरणी दिलशाद जैनुद्दीन फुलारी (वय ४०) हिला अटक केली आहे. याप्रकरणी महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फुलारी कुटंबिय काशेवाडीत राहायला असून, जैनुद्दीनला दारू पिण्याचे व्यसन होते. मद्यपान केल्यानंतर तो मुलगी दिलशादला शिवीगाळ करीत होता. १७ मे रोजी त्याने मुलीला शिवीगाळ केली. त्याच रागातून तिने स्वयंपाकघरातील चाकूने वडिलांवर वार करून ठार मारले. याप्रकरणी एपीआय कुलदीप व्हटकर तपास करीत आहेत.

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरूणाचा खून केल्याची घटना १७ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास वडगाव बुद्रूकमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपीविरूद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपेश सुरेश भांदिर्गे (वय ४१ रा. नर्‍हे ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या भावाने फिर्याद दाखल केली असून, आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करीत आहेत.

१५ दिवसांत ५ खून

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सक्षम असल्याचा दावा करणार्‍या पुणे पोलिसांना मात्र खूनाच्या घटना थोपवण्यात सपशेल अपयश आले आहे. विविध कारणांतून हे खून झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १५ दिवसांत ५ खूनाच्या घटनांमुळे पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×