दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

कोंढवा भागातील घटना

marathinews24.com

पुणे – दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना कोंढवा भागात घडली.
मोहम्मद हुसेन शेख (रा. भागोदयनगर, कोंढवा) असे मृत्यमुुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेख यांचा पुतण्या परवेज अब्दुल रेहमान (वय ३५) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बंगल्यातून २७ लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शेख हे १७ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोंढव्यातील शीतल पेट्रोल पंप परिसरातून निगाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या शेख यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेख यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×