Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

पुण्यात टोळीयुद्धाचा भडका

आंदेकर टोळीकडून तरुणावर कोयत्याने वार

marathinews24.com

पुणे – शहरात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका उडाला असून, माजी नगरसेवकर वनराज आंदेकरच्या खून प्रकणातील आरोपीच्या भावावर टोळक्याने पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात पिस्तुलातून गोळया झाडून कोयत्याने वार करून गंभीर जखमी केला आहे. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास राजर्षी शाहू बँकेसमोरील हाॅटेलसमोर ही घटना घडल्याने घबराट उडाली आहे. अक्षय उर्फ बाळा बापू म्हस्के (वय २६, रा. श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ, सर्व्हे क्रमांक २५, आंबेगाव पठार, धनकवडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पुण्यात लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षीय चिमुरडा ठार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर खून प्रकरणात अक्षय म्हस्के याचा भाऊ आकाशला उशीार अटक करण्यात आली होती. खून प्रकरणातील आरोपींना आकाश म्हस्के याने मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिली होती. त्यानंतर आकाश याला खून प्रकरणात अटक केली होती. आकाशचा भाऊ अक्षय हा पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात बुधवारी सकाळी नाश्ता करण्यासाठी गेला होता. राजर्षी शाहू बँक चौकात तो थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी अक्षयवर पिस्तुलातून गोळी झाडली. एक गोळी अक्षय याच्या पायात शिरली. हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी भेट दिली.

‘प्राथमिक चौकशीत अक्षय म्हस्के याच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत’, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून झाला होता. आंदेकर याचा खून वर्चस्वाचा वाद, तसेच संपतीच्या वादातून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर आंदेकर टोळीने वनराज याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष (वय २०, रा. लक्ष्मी सोसायटी, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) याचा सोसायटीच्या आवारात गोळीबार करुन खून ५ सप्टेंबर २०२५ रोजी केला होता. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याचा खून करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. आयुष कोमकर हा आंदेकर टाेळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा नातू होता. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह साथीदारांना अटक करण्यात आली होती.

१ नोव्हेंबर २०२५ राेजी आंदेकर टोळीने बदला घेण्यासाठी आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश किसन काळे (वय ३२, रा. येवलेवाडी, कोढवा) याचा कोंढव्यातील खडी मशीन चौकात गोळ्या झाडून खून केला होता. गणेश काळे हा रिक्षाचालक होता. वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिल्याप्रकरणी समीर काळे, आबा खोंड, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांना अटक करण्यात आली होती.

शहरात गेल्या दोन दोन दिवसात चौघांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी अक्षय काळे याच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार करण्यात आले. कात्रज बाह्यवळण मार्गावर रिक्षा चालकावर वैमनस्यातून भरदिवसा वार करण्यात आले. कोथरूड भागात एका तरुणावर वैमनस्यातून गजबलेल्या रस्त्यावर कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×