Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

कर्करोगावरील संशोधनासाठी रसायू कॅन्सर क्लिनिक व उत्तराखंड आयुर्वेद विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

आयुर्वेद-ॲलोपॅथीच्या संगमातून कर्करोग संशोधनाला नवी दिशा

marathinews24.com

पुणे – कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढा देण्यासाठी पारंपरिक आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्र (ॲलोपॅथी) यांचा मेळ घालणे ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने, पुण्यातील नामांकित रसायू कॅन्सर क्लिनिक आणि उत्तराखंड आयुर्वेद विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक आणि संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहे. कर्करोग संशोधनाला नवी दिशा देणाऱ्या या करारात नाविन्यपूर्ण आणि भविष्यवेधी तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.

मतदार याद्या होणार अधिक पारदर्शक; जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षणाला सुरुवात-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी

हरिद्वार येथील गुरुकुल कॅम्पसच्या कॅन्सर रिसर्च ओपीडीमध्ये हा औपचारिक करार सोहळा नुकताच झाला. उत्तराखंड आयुर्वेद विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अरुणकुमार त्रिपाठी आणि रसायू लाईफसायन्सेसचे रिसर्च व एज्युकेशनचे प्रमुख डॉ. अविनाश कदम यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. संशोधनावर आधारित आयुर्वेदाला कर्करोग उपचारांच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा या भागीदारीचा मुख्य उद्देश असून भविष्यात या माध्यमातून कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.

या कराराच्या औचित्याने हरिद्वारमध्ये दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना मोफत सल्ला दिला. कर्करोगाचे वेळेत निदान, आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, जीवनशैलीतील आवश्यक बदल आणि उपलब्ध उपचार पद्धती याबाबत रुग्णांमध्ये जनजागृती करण्यात आली.

प्रा. डॉ. अरुणकुमार त्रिपाठी यांनी कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करताना वेळेत निदान आणि योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्राची सांगड घातल्यास कर्करोग प्रतिबंध आणि उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडू शकतात, असे सांगितले.

कॅन्सर व्यवस्थापनामध्ये आयुर्वेदात अनेक प्रभावी आणि आशादायी उपचार उपलब्ध आहेत. यामुळे रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होते. वैद्यकीय अनुभव आणि संशोधनाच्या जोरावर या उपचार पद्धती अधिक सक्षम करण्याची गरज आहे, असे डॉ. अविनाश कदम यांनी नमूद केले.

गुरुकुल कॅम्पसचे संचालक प्रा. जी. पी. गर्ग यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, अशा आरोग्य शिबिरांमुळे केवळ जनजागृती होत नाही, तर आजाराचे प्राथमिक टप्प्यात निदान होऊन रुग्णाला वेळेत उपचार मिळणे शक्य होते. प्रा. ओ. पी. सिंग, प्रा. अजयकुमार गुप्ता, डॉ. देवेश शुक्ला, प्रा. मीना आहुजा आणि डॉ. राजीव कुमार यांच्यासह विद्यापीठाचे वरिष्ठ डॉक्टर्स, संशोधक आणि अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×