Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

हांडेवाडीत अवैध हातभट्टी दारूविक्री रडारवर

अडीच हजार लीटर रसायन जप्त

marathinews24.com

पुणे – अवैध हातभट्टी दारू विक्री करणार्‍याविरूद्ध काळेपडळ पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्याच्याकडून तब्बल ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीकडून मोटार, अडीच हजार लीटरचे ७० कॅन जप्त केले. सातवनगर, हांडेवाडी रोड परिसरात कारवाई करण्यात आली. सुनील हरी कचरावत (वय ५०, रा. गणपती मंदिराजवळ, सातवनगर, हांडेवाडी रोड, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.

आंदेकर टोळीला नातलगांच्या भेटीगाठीना आडकाठी – सविस्तर बातमी

काळेपडळ पोलीसांचे तपास पथक अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार नितीन ढोले व गिरीराज जगताप यांना सातवनगर परिसरात चारचाकी वाहनांमध्ये गावठी हातभट्टी दारूचा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसींग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. आरोपीला ताब्यात घेउन त्याच्याकडून २४५० लिटर हातभट्टी दारूचे ७० प्लास्टिक कॅन जप्त केले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, एपीआय अमित शेटे, प्रशांत काळभोर, अमोल फडतरे, वाजिद सय्यद, प्रतीक लाहिडे, शाहिद शेख, विशाल बोबडे, लक्ष्मण काळे, अतुल पंढरकर, नितीन ढोले, सहाम तांबोळी, प्रदीप बेडेकर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगताप यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×