गुटखा माफियांना दणका; १२ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

बीड शहर, सिरसाळा आणि युसुफवडगावामध्ये कारवाया

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – गुटखा व तंबाखूजन्य पदार्थावर वाहतुक व विक्रीवर बंदी असतानाही बीड जिल्ह्यात मात्र दिवसेंदिवस गुटखा विक्री होत आहे. यामुळे जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) रविवारी ( दि. ३१ ) कारवाया करत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यामध्ये बीड शहर, सिरसाळा आणि युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या या कारवायांमध्ये १२ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

मृत्यूंचा आकडा दडपला जातोय का? विषारी दारू मृत्यूकांड – सविस्तर बातमी

स्थानिक गुन्हे शाखेने सलग कारवाया केल्या मुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये दहशत निर्माण होऊन एकच खळबळ उडाली आहे. पहिल्या कारवाईत बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत बस स्थानकासमोर गुटखा विक्री करताना एकजण आढळून आला. त्याच्या ताब्यातून २ लाख २१ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक खटावकर, पोलीस हवालदार राहुल शिंदे, आशोक दुबाले, विकास राठोड, अर्जुन यादव, पोलीस अंमलदार मनोज परझने, आशपाक सय्यद, नितीन वडमारे यांनी केली.

दुसऱ्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिरसाळा हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पवनेर (ता. परळी) येथे छापा टाकला. आरोपीच्या राहत्या घरातून व वाहनातून विविध कंपनीचा प्रतिबंधित पान मसाला व गुटखा जप्त केला .या प्रकरणी पोलीस ठाणे सिरसाळा गुन्हा क्रमांक १५२/२०२६ अंतर्गत कलम १२३, २७४, २७५, २२३ बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जगन्नाथ तातेराव भरड (वय ५५, रा. पोहनेर ता. परळी, जि. बीड) याच्या ताब्यातून ३ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा गुटखा व २ लाख १० हजार रुपयांचा टेम्पो, असा ५ लाख ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई एचसी रामचंद्र केकान, एचसी गोविंद भताने आणि पीसी सचिन आंधळे यांनी केली. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिली.

तिसऱ्या कारवाईत युसुफ वडगाव (ता.केज )पोलीस ठाणे हद्दीत एक इसम स्विफ्ट कारमधून गुटखा वाहतूक करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून ५० हजार रुपयांचा गुटखा आणि ४ लाख रुपयांची स्विफ्ट कार, असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार जोगदंड, पठाण, दिलीप गित्ते, घोडके, मराडे यांनी केली. या कारवाया पोलीस अधीक्षक नवनीत कॅावत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस उपाधीक्षक वेंकटरमन, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखेने एका दिवसात तीन ठिकाणी कारवाया करून गुटखा माफियांना मोठा दणका दिल्याने जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व वाहतुकीवर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×