Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

तोतया महिला पोलीस उपनिरीक्षकाला पकडले

१० कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणात रिलस्टारला बेड्या

खाकी गणवेशात रुग्णालयात प्रवेश

marathinews24.com

पुणे – खाकी गणवेश परिधान करुन पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करणाऱ्या महिलेला लष्कर पोलिसांनी अटक केली. लष्कर भागातील एका रुग्णालयात वैद्यकीय तज्ज्ञांची भेट लवकर मिळावी म्हणून तिने खाकी गणवेश परिधान करुन बतावणी केल्याचे उघडकीस आले आहे.

एमएनजीएल मीटर अपडेटच्या बहाण्याने जेष्ठाची साडेतीन लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

या प्रकणी समिना आफिस इनामदार उर्फ समिना आयुब पठाण (वय २५, रा. म्हाळुंगे) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. इनामदार हिला पोलिसांनी अटक केली. याबाबत सहायक पोलीस फौजदार महेश शिंदे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (६ जून) सकाळी दहाच्या सुमारास आरोपी महिला व्हिक्टरी चित्रपटगृहासमोरील एका खासगी रुग्णालयात आली होती. त्या वेळी रुग्णालयात सहायक फौजदार शिंदे हे तपासणीसाठी गेले होते. शिंदे यांना पाहिल्यानंतर इनामदाराने त्यांच्याकडे कोणत्या पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहात अशी विचारणा केली. वैद्यकीय तज्ज्ञांचा भेट घेण्यासाठी मी आली असून, माझा क्रमांक लावा, असे तिने त्यांना सांगितले. शिंदे यांनी इनामदारने परिधान केलेल्या गणवेशावरील ‘नेमप्लेट’ (संपूर्ण नाव) पाहिली. तेव्हा तिने ‘नेमप्लेट’ गणवेशावर चुकीच्या पद्धतीने लावली होती. उजव्या बाजूला नेमप्लेट न लावात गणवेशावरील डाव्या बाजूस लावली होती. शिंदे यांना संशय आला. त्यांनी तिच्याकडे विचारणा केली.

तेव्हा तिने बाणेर पोलीस ठाण्यात नियुक्तीस असून, रात्रपाळीवरुन थेट रुग्णालयात आल्याचे त्यांना सांगितले. संशय आल्याने शिंदे यांनी लष्कर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. महिला पोलिसंनी इनामदार हिची चौकशी केली. तेव्हा आरोपीने पोलीस असल्याची बतावणी केल्याचे उघड झाले. पोलीस उपनिरीक्षक यादव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×