Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत कार्यशाळा संपन्न

कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत कार्यशाळा संपन्न

आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळा संपन्न

marathinews24.com

बारामती – आरोग्य विभागाच्यावतीने पावसाळ्यातील उद्भवणारे कीटकजन्य आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या हिवताप उपपथक कार्यालय, प्रशासकीय भवन येथे नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय – सविस्तर बातमी 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे म्हणाले, पावसाळ्यात डेंग्यू, चिकणगुनिया अशा कीटकजन्य आजारावंर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून यावर्षीही किटकशास्त्रीय सर्वेक्षण करुन घ्यावे. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांना संशयित रुग्णाचे रक्तजल नमुना वेळेत तपासणी करण्यासोबत कर्मचाऱ्यांशी समन्वय ठेवावे.

आपल्या भागातील ग्रामपंचायत पदाधिकारी व परिसरातील शाळेत देखील जनजागृती करावी. जुलै महिन्यात पालखी सोहळा असल्याने आतापासूनच परिसरातील विहीर, हातपंप शुद्धीकरण करण्याची मोहिम हाती घ्यावी, असे डॉ. खोमणे यांनी सूचना दिल्या.

आरोग्य पर्यवेक्षक सुप्रिया सावरकर यांनी नियमित किटकशास्त्रीय सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. तसेच संदिप बालगुडे व गणेश घोरपडे यांनी डेंग्युरुग्णांचा शोध व गप्पी मासे तसेच हिम्मत कौले व गणेश जाधव यांनी ‘हसत खेळत डेंग्यूवर पाळत’ आणि बी. एस. एस. उपाध्ये यांनी आयुर्वेदिक वनस्पतीव्दारे डास नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×