पुण्यात चार पिस्तुलांसह तिघांना अटक

पुण्यात चार पिस्तुलांसह तिघांना अटक

कोथरूड पोलिसांची धडक कारवाई

marathinews24.com

पुणे – कोथरूड पोलिसांनी धडक कारवाई करत चार गावठी पिस्तुलांसह १२ जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी जप्त केली असून या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ३२ हजार रुपये इतकी आहे. निशांत रमेश सातपुते (वय २२, रा. गणेशनगर, एरंडवणे) संकेत प्रकाश निवंगुणे (वय २४, रा. यशोदिप चौक, वारजे माळवाडी) श्रवण पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वादातून रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड मारला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार शकील पठाण यांना १६ जूनला कमिन्स कंपनीच्या पाठीमागील परिसरात काही संशयित व्यक्ती पिस्तूल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सापळा रचून कारवाई केली. यावेळी निशांत आणि संकेत पोलिसांना मिळून आले. झडतीदरम्यान निशांत सातपुते याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत संकेत याने त्याचा साथीदार श्रवण पवार याच्याकडे आणखी शस्त्रे असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी १९ जून रोजी श्रवण पवार याला अटक केली. त्याच्याकडून आणखी तीन गावठी पिस्तुले आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुधीर घुले करत आहेत.

ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त सागर कवडे आणि सहायक पोलिस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील कारोटे, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर घुले, पोलिस अंमलदार शकील पठाण, संजय दहिभाते, दत्तात्रय सोनवणे, श्रीकांत दगडे, अंबादास लोखंडे, मयूर पांडरे, ऋषिकेश कोळपे, ज्ञानेश्वर पांचाळ, मंगेश शेळके आणि वैभव शितकाल यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×