पुण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांकडून सुनेचा छळ

पुण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांकडून सुनेचा छळ

आरोपीला कडक शिक्षा करण्याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा

marathinews24.com

पुणे – शहरातील कोंढवा परिसरात विवाहितेचा निवृत्त सहायक आयुक्तासह कुटुंबातील इतर लोकांनी सुनेचा छळ केल्याची घटना घडली आहे. फिर्यादीचा विवाह २०२२ मध्ये झाला होता. लग्नाला सर्व खर्च तसेच मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने पीडितेच्या आई वडिलांकडून दिले होते. पती, सासू, सासरे, नंणदा वारंवार पैशाची मागणी करून त्रास देत होते. पती बाहेर दुसऱ्या मुलींसोबत फिरत होता. ते फोटो इंस्टाग्रामवर टाकत असे. पीडीतेला तिचे सोशल मीडिया अकाउंट देखील बंद करण्यास भाग पाडले होते.

केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ॲसिडचे कॅन चोरणारी टोळी गजाआड – सविस्तर बातमी 

केसच्या संदर्भामध्ये पुणे शहरातल्या कॅन्टोन्मेंटशी संबंधित कोंढवा आणि खराडी भागातल्या डीसीपी विजयलक्ष्मी शिवणकर यांच्याशी नीलम गोर्हे तपशीलवार सविस्तर चर्चा केली. सध्या भारतीय न्याय संहितेमध्ये जे बदल झालेले आहेत. ते पाहता( ४९८ कलम ) पूर्वीच हे लावल्यावर ते सात वर्षाच्या आधी शिक्षा असल्यामुळे आरोपीला अटक करण्याच्या आधी पूर्व सूचना द्यावी लागते. या नवीन तरतुदीमुळे जवळजवळ कोणत्याही केसमध्ये मारहाण किंवा छळ सत्य असलं तरी कारवाई करणे हे अतिशय अवघड झालेल आहे. या पार्श्वभूमी वरती संबंधित महिलेला कलम (४९८ ) लावण्याच्या अगोदर तिला वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या कुटुंबीयांनी केलेलं कट कारस्थान याबद्दलचे काही अनुभव असतील तर ते देखील नोंदवून घेणे फार गरजेचे आहे. जेणेकरून तिने याच्यापूर्वी का तक्रार दिली नाही. त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती कोर्टाला आणि न्याय यंत्रणेला व्यवस्थित माहिती होऊ शकेल.

एप्रिल महिन्यामध्ये पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे नीलम गोर्हे यांनी महिलांविरुद्ध होणारे गुन्हे व महिला बाल कल्याणचे आयुक्त यांच्या बैठका घेतल्या होत्या. त्या बैठकीमध्ये त्यांनी असे निर्देश दिलेले होते हे ४९८ लावत असताना तो लावल्यावरती कौटुंबिक संरक्षण अधिकाऱ्यांकडेही ती केस नोंदवून त्यानुसार दिवाणी कायद्यानुसार सुद्धा त्यामध्ये कसा न्याय मिळू शकेल याबद्दल त्यांना महिला तक्रारदारांना अवगत करण्यात यावे. जेणेकरून त्यामध्ये संपत्तीत वाटा किंवा राहण्याच्या घरात राहण्याचा अधिकार मिळू शकेल या घटनेमध्ये तशीच ताबडतोब पुढील कारवाई आवश्यक आहे. याच्या संदर्भात डीसीपी विजयालक्ष्मी शिवणकर यांचे लक्ष वेधले आहे व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदनाद्वारे अवगत केले आहे. डिसीपी विजयालक्ष्मी शिवणकर यांनी महिलांना सुरक्षा देण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करत असून सर्व वस्तुस्थितीची माहिती घेऊन आम्ही कारवाई करणार असल्याचे सांगितले.

केस हाताळण्याबाबत दिलेल्या सुचनाांचा अंतर्भाव करण्याचे डीसीपींनी आश्वासन पिडीत मुलीचे समुपदेशन करण्यास लक्ष देण्याबाबतही सकारात्मक भुमिका घेतली . पीडितेची आर्थिक परिस्थिती नसतानाही वारंवार धमक्या देऊन तिचे खच्चीकरण करण्यात येते असे अनेक गुन्हे समोर येऊन पीडितांना न्याय मिळेल असेही मत डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जामीन मिळू नये याची दक्षता घेण्यात यावी. अश्या अपप्रवृत्ती व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात अश्या गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही अशा प्रकारच्या घटनांना निश्चितच आळा बसेल असेही त्या म्हणाल्या. महिलांनी सुद्धा सजग राहून सावधानता बाळगावी असे आवाहन ही त्यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×