केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ॲसिडचे कॅन चोरणारी टोळी गजाआड

केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ॲसिडचे कॅन चोरणारी टोळी गजाआड

नांदेड सिटी पोलिसांची कामगिरी; २० लाखांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिडचे कॅन चोरणाऱ्या तीन जणांच्या टोळीला नांदेड सिटी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत गजाआड केले. आरोपींकडून १५ लाख ४० हजार रुपयांचे १५४ कॅन तसेच गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन असा एकूण २० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वैभव बाळासाहेब चव्हाण (वय २६, रा. मॅपल रेसिडेन्सी, धायरी) रोहन संतोष इंदुलकर (वय २९, रा. मॅपल रेसिडेन्सी, धायरी) निखिल तानाजी पवार (वय २३, रा. आकाश होम्स, धायरी) यांना अटक केली.

इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

नांदेड सिटी पोलिस ठाण्यात धायरी येथील रिलायबल केमिकल्सच्या गोडावूनमधून २५ लिटर क्षमतेचे रॅनकेम कंपनीच्या ऑर्थो फॉस्फोरिक ॲसिडचे कॅन चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस यांनी तातडीने तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान अंमलदार संग्राम शिनगारे, शिवाजी क्षीरसागर आणि मोहन मिसाळ यांनी गोपनीय माहितीच्या आधारे वैभव बाळासाहेब चव्हाण (वय २६, रा. मॅपल रेसिडेन्सी, धायरी), रोहन संतोष इंदुलकर (वय २९, रा. मॅपल रेसिडेन्सी, धायरी) आणि निखिल तानाजी पवार (वय २३, रा. आकाश होम्स, धायरी) यांना ताब्यात घेतले. चौकशीत तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक केली.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त सागर कवडे, एसीपी विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत, पोलिस अंमलदार संग्राम शिनगारे, शिवाजी क्षीरसागर, मोहन मिसाळ, निलेश कुलथे, अक्षय जाधव, सतीश खोत, स्वप्नील मगर, निलेश खांबे, राजू वेगरे, प्रतीक मोरे आणि भीमराज गांगुडे यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×