Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवात

Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवात

उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा

marathinews24.com

पुणे – पुणे शहर व जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळ पासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने रात्री उशिरापर्यंत विविध भागांत रिमझिम पाऊस सुरू ठेवला. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूकही प्रभावित झाली. या पावसामुळे उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्न – सविस्तर बातमी 

मंगळवारी (२३ जून) सकाळपासूनच पुणे शहरात आकाश ढगाळले होते. दुपारच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर भुरभुर पाऊस सुरू होता. सायंकाळी मात्र पावसाने अधिक जोर धरला. मध्यवर्ती भागासह शहरातील अनेक परिसरांत रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम चालू होती. यामुळे नागरिकांना तापलेल्या हवामानापासून आराम मिळाला.

भारतीय हवामान विभागाने पुणे शहर व जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मंगळवारी शहराचे कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर, तसेच पवना आणि मुळशी या प्रमुख धरण परिसरात मंगळवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत या सर्व धरण क्षेत्रांत सरासरी ९५.८४ टक्के कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. धरणांतील साठ्यात लक्षणीय वाढ झालेली नसली तरी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या सरींनी मोठा दिलासा दिला आहे. धरण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×