बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात सुपुत्र सौरभ सोनवणेचे नाव
marathinews24.com
बीड : (अनंत जाधव) – जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हत्या प्रकरणात विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी दिलेल्या जबाबात खासदारपुत्र सौरभ सोनवणे याचं नाव समोर आल्यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. सौरभ सोनवणे याचा प्रकरणात पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला. या खुलाशामुळे प्रकरणाला नवं वळण लागले असून राजकीय आणि सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जबाबातील या उल्लेखामुळे पोलीस यंत्रणांसमोर अनेक वेगवेगळ्या नवीन सवाल उपस्थित होत आहेत.
कौटुंबिक वादातून महिलेचा खून – सविस्तर बातमी
खासदार बजरंग सोनवणे यांच्या सौरव सोनवणे या मुलाचे पुरवणी जबाबत नाव आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तपासात काही निष्पन्न न झाल्यास नाव वगळले जाणार असल्याचे सांगितले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव पुरवणी जबाबात घेतल्यामुळे सोनवणे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण लागले असून या हत्या प्रकरणांमध्ये दि.२३ मंगळवार रोजी दिवसभर नातेवाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक केज पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले होते.
विलास घुले प्रकरणात बजरंग सोनवणे यांच्या मुलावर अनेक आरोप केले जात आहेत. मात्र बजरंग सोनवणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, विनाकारण चुकीच्या पद्धतीने दबाव आणला जात असून आमचा त्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही सीडीआर तपास करा सीसीटीव्ही चेक करा, जे करायचे ते करा दोषी निघाल्यास कारवाई करा. मात्र या प्रकरणात अद्यापपर्यंत ९ आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.
विलास घुलेचा मृतदेह रात्री ११ वाजता नातेवाईकांकडून ताब्यात घेण्यात आला असून पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत हे ठाण्यामध्ये यावेळी उपस्थित होते. पोलिस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलिस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणांमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा पुरवणी जबाबामध्ये नाव घेण्यात आले आहे. यामुळे बजरंग सोनवणे यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.
काय म्हणाले पोलीस अधीक्षक कॉवत
पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले की, प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जे खरे असेल ते समोर येईल. जे चुकीच्या पद्धतीने कोणी जर करत असेल तर तुमच्यावर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
सुपुत्राचे नाव पुढे येताच आरोप प्रत्यारोप सूरु
खासदार बजरंग सोनवणे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली आहे.त्यामध्ये ते म्हणाले “तो काय नेता आहे. मी कोणालाही घाबरत नाही. मी बीडचा वाघ आहे, मातीत येऊन काम करणाऱ्याला नेता म्हणातात, त्याच्या सारखं रात्री. जाऊ द्या मी आर्ध्या तासात याबाबत बोलतो.” अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना थेट आव्हान दिले. त्यांच्या या वक्तव्यानंतर बीडच्या राजकारणात नव्या चर्चाना उधाण आल्याचे पाहिला मिळत आहे.
सौरवची प्रकरणाबाबत पहिली प्रतिक्रिया
हत्या प्रकरणात माझा काही संबंध नाही. विलास घुले यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि चुकीची घटना आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. घटनेच्या दिवशी मी दुपारपर्यंत येडेश्वरी साखर कारखान्यावर होतो. त्यानंतर दुसन्या दिवशी सकाळपर्यंत घरीच होतो.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून माझी गाडीही घराजवळ असल्याचे त्यात स्पष्ट दिसत आहे. मी खासदारांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभानी होत असतो. हे काहींना खटकत असल्यामुळेच, माझे नाव या प्रकरणात गोवले जात आहे का, असा प्रश्न आम्हाला पडतो. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी. सत्य समोर आले पाहिजे. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही.पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले असून त्यातूनही वस्तुस्थिती स्पष्ट होईल. पोलीस प्रशासन सत्य जनतेसमोर आणेल, असा मला विश्वास आहे.





















