Breking News
पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

पुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझर

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील वडगाव बुद्रुक भागातील सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात दहशत माजविणारा गुंड मनोज पाडुळे याने बांधलेल्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझर चालवून पाडण्यात आले. पाडुळे आणि साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती.

पुरावा मिळू नये म्हणून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने रचला कट – सविस्तर बातमी

‘सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात पाडुळे याने बेकायदा हाॅटेल बांधले होते. या भागातील मोकळ्या जागेवर बांधण्यात आलेल्या हाॅटेल व्यवसायातून पाडुळे टोळीला आर्थिक रसद मिळत होती. मकोका कारवाई केल्यानंतर तो फरार झाला असून, या टोळीला मिळणारी आर्थिक रसद तोडण्यासाठी बेकायदा हाॅटेलवर कारवाई करण्यात आली’, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली. वडगाव बुद्रुकमधील सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात पाडुळे टोळीची दहशत आहे. पाडुळे याने मोकळ्या जागेत बेकायदा मातोश्री नाावचे हाॅटेल बांधले होते. हाॅटेलमध्ये पाडुळे आणि साथीदार नियमित भेटायचे. तेथे गुन्हेगारी कट आखायचे. पाडुळे याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण असे गंभीर स्वरुपाचे १५ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×