Breking News
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ – विशेष लेखकोथरूडमध्ये तरुणावर शस्त्राने वार; तिघांविरुद्ध गुन्हापुण्यात वस्त्रदालनातून साडेचार लाखांची रोकड लंपासगोळीबार करणारा बिष्णोई टोळीतील एक जण ताब्यातपालखी सोहळ्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून पाच हजारांचा बंदोबस्तसिंहगड किल्ला, वरंधा घाटात दरड कोसळलीविवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे आवाहनपवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणारसिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडीत रवानगीआषाढी वारीसाठी मोठा बंदोबस्त- पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल

पुण्यात वस्त्रदालनातून साडेचार लाखांची रोकड लंपास

शहरात दुकानांतून रोकड चोरीचे प्रकार वाढले

marathinews24.com

पुणे – वस्त्रदालनाच्या खिडकीचे गज उचकटून चाेरट्यांनी गल्ल्यातील ४ लाख ६० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वस्त्रदालनाच्या मालकांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गोळीबार करणारा बिष्णोई टोळीतील एक जण ताब्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर सासवड रस्त्यावर ऊरळी देवाची परिसरात नवल टेक्सटाईल मार्केट हे वस्त्रदालन आहे. वस्त्रदालनाच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे लोखंडी गज उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील चार लाख ६० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी (३ जुलै) मध्यरात्री घडली. सकाळी वस्त्रदालन उघडल्यानंतर रोकड चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी वस्त्रदालनातील दूरचित्रवाणी संचाचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×