Breking News
पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

कोथरूडमध्ये तरुणावर शस्त्राने वार; तिघांविरुद्ध गुन्हा

वडिलांना मारहाण केल्याने तरुणाचा केला खून

खोथरूड परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कोथरूड भागातील जयभवानीनगर परिसरात घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मयूर जाधव (वय २०), काशी जाधव (वय २०, दोघे रा. किष्किंदानगर, पौड रस्ता, कोथरूड) यांच्यासह तिघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रतन विकास कांबळे (वय ४०, रा. विकास मित्र मंडळाजवळ, काेथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे यांचा मुलगा २ जून रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास पौड रस्त्यावरील जयभवानीनगर परिसरात थांबला होता. तो बहिणीशी मोबाइलवर बोलत होता. त्या वेळी वैमनस्यातून त्याच्या डोक्यावर आरोपीने शस्त्राने वार केले. पोलीस हवालदार सुळ तपास करत आहेत.

पुण्यात वस्त्रदालनातून साडेचार लाखांची रोकड लंपास – सविस्तर बातमी

महिलेला पट्ट्याने मारहाण

कामावर जाण्यास सांगितल्याने एकाने पत्नीला चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केल्याची घटना लोहियानगर परिसरात घडली. या प्रकरणी सूरज नंदू सकट (वय २७), किरण कवरे (दोघे रा. लोहियानगर, महात्मा फुले पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्नी कांचन सूरज सकट (वय २३) हिने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज हा २ जून रोजी दुपारी घरी झोपला होता. त्या वेळी पत्नीने त्याला कामावर जाण्यासाठी झोपेतून उठविले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. पतीने तिला चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केली. साथीदाराने तिला शिवीगाळ केली. पोलीस हवालदार काळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×