मित्राच्या खुनानंतर फरार झालेला आरोपी १२ तासांत जेरबंद

पुण्यात मोबाईल चोरणार्‍याला अटक, ३५ मोबाईल जप्त

परराज्यातील आरोपीचा साताऱ्यात लागला माग; वाघोली पोलिसांची १२ तासांत गुन्ह्याची उकल

marathinews24.com

पुणे – मित्राचा खून करून फरार झालेल्या परराज्यातील आरोपीला वाघोली पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. सुरज अमृत साव (वय ३५, रा. भालुका, जि. नाडीया, पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव असून, त्याला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सातारा येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

पुण्यात फार्महाऊसवर छापा; हुक्का विक्री करणाऱ्यांवर कारवाई – सविस्तर बातमी

वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिवशंकर सिंह यांचा खून झाला होता. याप्रकरणी १ जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत शिवशंकर आणि आरोपी सूरज हे दोघेही सेंट्रिंग साइटवर बिगारी म्हणून काम करत होते. राहत असलेल्या खोलीत झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी सूरज साव याने मित्र शिवशंकर सिंह याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. आरोपी पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याने त्याचा ठावठिकाणा शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार विशाल गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपास पथकातील पोलिस अंमलदार प्रदीप मोटे, सुनील कुसाळकर आणि दीपक कोकरे यांनी सातारा येथील आदर्शदीप नगर परिसरातील बांधकाम साइटवर छापा टाकून आरोपी सूरज अमृत साव याला ताब्यात घेतले. कारवाईमुळे गंभीर स्वरूपाच्या या खुनाच्या गुन्ह्याची केवळ १२ तासांत उकल करण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार, सहायक पोलिस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक निरीक्षक विनायक आहिरे, उपनिरीक्षक शहादेव हवाले, भाग्यश्री थोरात, शिवशंकर राघू, पोलिस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, सुनील कुसाळकर, दीपक कोकरे, विशाल गायकवाड, समीर भोरडे, संदीप टिकोणे, राजेश लोखंडे आणि बाजीराव विघ्ने यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×