पुण्यात २९ ठिकाणी झाडे कोसळली, वाहतुकीची कोंडी

अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडांच्या फांद्या हटवून रस्ते केले वाहतुकीस खुले

marathinees24.com

पुणे – शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे २९ ठिकाणी झाडे कोसळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात स्फूर्ती सोसायटीच्या आवारात झाड पडल्यानंतर रस्ता बंद झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला करुन दिला.

गणेशभक्तांसाठी मोफत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन सेवा – सविस्तर बातमी

‘शहरात सुरू असलेल्या पावसामुळे वेगवेगळ्या भागात २९ ठिकाणी झाडे काेसळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या शहरातील विविध केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटविल्या. रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले’, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

येरवड्यातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, हडपसर येथील मगरपट्टा, गणेशखिंड रस्त्यावरील मोदीबाग, लोहगाव, कोथरूडमधील मयूर काॅलनी, डहाणूकर काॅलनी, मंत्री पार्क,तसेच करिष्मा सोसायटी, सेनापती बापट रस्ता, मार्केट यार्ड, नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौक, येरवड्यातील मनोरुग्णालयाजवळ, वारजे माळवाडी, विश्रांतवाडी, कोंढव्यातील भागोदयनगर, पाषाण-बाणेर रस्ता, हडपसरमधील ससाणेनगर, अप्पा बळवंत चौकातील प्रभात चित्रपटगृहाजवळ, शिवाजीनगर येथील दीपबंगला चौक, गणेश पेठेतील पोलीस चौकशेजारी, कोरेगाव पार्क गल्ली क्रमांक ५ , तसेच कोथरूडमधील सिटी प्राईडजवळ झाडे पडण्याच्या घटना घडल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×