Breking News
बारामती येथे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभराज्यात २३ ठिकाणच्या दुध डेअर्‍यावर छापेमारीपुण्यात पावसामुळे सोसायटीतील सीमाभिंत कोसळून १८ वाहनांचे नुकसानघरकाम करणाऱ्या महिलेकडून २ लाखांच्या अंगठ्या लंपासपीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरीलाविशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत घरभेटींची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून पाहणीबेल्हे येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचे उद्या उद्घाटनएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरणतळेगाव नगर परिषदेअंतर्गत संभाजीनगर येथील पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक चाचणीबाबतचा खुलासाशासकीय नोकरीच्या आमिषाने १५ लाखांची फसवणूक

बुधवार पेठेत तरुणांना धमकावले, लुटणाऱ्या पोलिसांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

फरासखाना पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपयांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील बुधवार पेठेत आलेल्या तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी देून त्यांच्याकडून दोन हजार रुपये घेणाऱ्या फरासखाना पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपयांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारूगोळा कारखान्यातील सुरक्षारक्षकाची गोळी झाडून आत्महत्या – सविस्तर बातमी

या प्रकरणी विवेक पाटील, राहुल दाभाडे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २४ वर्षीय तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार तरुण हडपसर भागात राहायला आहे. तो एका हाॅटेलमध्ये कामाला आहे. २९ जुलै रोजी तो दोन मित्रांसोबत शनिवारवाडा पाहण्यासाठी आला होता. तेथून तरुण आणि त्याचे मित्र फिरत फिरत लक्ष्मी रस्ता परिसरात आले. रात्री साडेअकराच्या सुमारास ते बुधवार पेठ परिसरातून निघाले होते. त्या वेळी तेथे नाकाबंद लावण्यात आली होती. पोलीस शिपाई विवेक पाटील आणि राहुल दाभाडे हे दुचाकीवरुन तेथे आले. दोघांनी फिर्यादी तरुण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना अडवले. त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. तेव्हा तिघांनी मोबाइलमधील आधारकार्ड त्यांना दाखविले. त्यानंतर दोघांनी तरुणासह मित्रांना धमकावले. ‘तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल. तुम्हाला न्यायालयात न्यावे लागेल, असे सांगितले. तेव्हा तरुण आणि त्याच्याबरोबर असलेले मित्र घाबरले. पोलीस शिपाई पाटील आणि दाभाडे यांनी कारवाई न करण्यासाठी तिघांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये असे १५ हजार रुपये मागितले. तेव्हा तरुणाने ‘आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. मित्राकडून दोन हजार रुपये ऑनलाइन मागवून घेतो’, असे सांगितले. त्यानंतर तरुणाला दुचाकीवरुन घेऊन बुधवार पेठेत गेले. तेथील एका ओळखीच्या महिलेच्या मोबाइलवर ऑनलाइनला पद्धतीने दोन हजार रुपये पाठविण्यास सांगितले.

तरुणाने हाॅटेलच्या मालकाशी संपर्क साधला. अडचणीत असल्याचे सांगून हाॅटेल मालकाला तातडीने दोन हजार रुपये पाठवून देण्यास सांगितले. महिलेच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर हा प्रकार कोणाला सांगायचा नाही, अशी धमकी पोलीस शिपाई पाटील आणि दाभाडे यांनी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरुण आणि मित्र घरी निघाले. त्यांनी कॅबची नोेंदणी केली. कॅबचालक तेथे आल्यानंतर त्याला या घटनेची माहिती दिली.

कॅबचालकाने याबाबतची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित केली. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली. चौकशीत दोघांनी बुधवार पेठेत तरुणांना धमकावून पैेसे घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×