Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

राज्यात २३ ठिकाणच्या दुध डेअर्‍यावर छापेमारी

पुण्यात पब्स, हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाचे छापे

पुणे ग्रामीण पोलिसांसह एफडीएची संयुक्त कारवाई; ३६ तास ऑपरेशन, अडीच कोटींचा ऐवज जप्त

marathinews24.com

पुणे – रसायन, शॅम्पू आणि पावडच्या मदतीने भेसळ असलेल्या केमिकलयुक्त दुधाची निर्मितीचा पुणे ग्रामीण पोलिसांसह अन्न व औषध विभागाने पर्दाफाश केला आहे. संबंधित भेसळयुक्त दुध मोठमोठ्या डेअरींना विक्री करून लाखो रूपये कमवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. राज्यातील तब्बल २३ ठिकाणांवरील दुध डेअर्‍यांमध्ये छापेमारी करण्यात आली. त्याद्वारे अडीच कोटीहून अधिक रकमेचा ऐवज जप्त केला आहे. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती, सिल्लोडमध्ये कारवाईचा बडगा उगारला. अन्न औषध विभाागाचे आयुक्त तुकाराम मुंडे, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने काम केले.

पुण्यात पावसामुळे सोसायटीतील सीमाभिंत कोसळून १८ वाहनांचे नुकसान – सविस्तर बातमी

राज्यातील विविध भागातील हॉटेलसह अन्न पदार्थांची निर्मिती करणार्‍या व्यावसायिकांकडून सातत्याने नियमांचे उल्लंघन केले जात होते. त्यापार्श्वभूमीवर अन्न व औषध विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून आयुक्त तुकाराम मुंडे यांनी बेशिस्तासह भेसळ खोरांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. भेसळयुक्त खवा, पनीर, खाद्यपदार्थ, शीतपेयाविरूद्ध कारवाई केली जात आहे. मुंडेच्या धडाक्याने व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, भेसळयुक्त पदार्थांची पोलखोल होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पुणे, पिंपरी-िंचचवड, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भेसळखोरांविरूद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दुध डेअरीद्वारे संकलन करताना छोट्या संकलनांकडून मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी एफडीए विभागाल्या प्राप्त झाल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंडे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकांची नियुक्ती करण्यात आली. पुणे एलसीबी पथकाचे प्रमोद क्षीरसागर यांच्या टीमने पुणे जिल्ह्यातील मंचर, सांगलीमधील आटपाडी, अहिल्यानगरमधील राहूरी, सिल्लोडसह २३ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. तब्बल ३६ तास ऑपरेशन राबवून भेसळखोरांना दणका देण्यात आला. एकाचवेळी दुध भेसळखोरांविरूद्ध कारवाई केल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अशी केली जात होते भेसळ

केमीकल, शॉम्पू, दुधाची पावडर एकत्रित करून भेसळयुक्त दुधाची निर्मिती केली जात होती. गावोगावी छोट्या संकलकांकडून दुध गोळा केल्यानंतर एकत्रित केलेल्या दुधात भेसळयुक्त दुध मिसळले जात होते. भेसळयुक्त दुध आणि शेतकर्‍यांनी घातलेला रतीब एकत्रित झाल्यानंतर दूध टँकरद्वारे मोठमोठ्या डेअरीला विक्रीसाठी रवाना केले जात होते.

दूध निर्मितीसाठी १५ रूपये प्रतिलीटरचा खर्च

भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी प्रतिलीटर १५ रूपये खर्च येत होता. त्यानंतर छोट्या दुध संकलकांकडून १०० लीटर दुधामागे १० ते १५ लीटर भेसळयुक्त दुध एकत्रित केले जात होते. त्यानंतर टँकरमध्ये भेसळयुक्त दुध एकत्रित करून मोठ्या डेअरीसाठी पाठवले जात होते. या कारवाईमुळे भेसळखोरांना मोठा हादरा बसला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×