Breking News
माऊलींच्या मानाच्या अश्वांची ‘दगडूशेठ’ गणपतीला मानवंदनाकै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वर्धापन दिनी महापौर आणि पोलिस आयुक्तांच्या हस्ते महाआरतीशुभम आव्हाळे ठरला ‘साहित्य केसरी महाकाव्य करंडक २०२६’चा विजेतामुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कतापुण्यातील नाना पेठेत वाड्याची भिंत कोसळली, ३ दुचाकींचे नुकसानमिसिंग लिंकवरील दरड बोगद्याबाहेरचविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी सहकार्य करावेपुण्यात वाहतूक पोलिसांचे प्रसंगावधान, टेम्पो चालकाचा वाचवला जीवनिम्मी बोपोडी पाण्यात; उपमहापौर परशुराम वाडेकर धावले नागरिकांच्या मदतीलाबेल्हे येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या आधुनिक धान्य गोदामाचे उद्घाटन; शेतकऱ्यांना वैज्ञानिक साठवणुकीची सुविधा

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी सहकार्य करावे

गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार ; ९६ तासांत होणार घरपोच

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून दिनांक ३० जून पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती घेण्यासाठी गणना अर्ज वितरीत करत आहेत. गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदारांची माहिती घेण्यासाठी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सोसायटी अध्यक्ष व सचिवांनी पूर्णपणे सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.

निम्मी बोपोडी पाण्यात; उपमहापौर परशुराम वाडेकर धावले नागरिकांच्या मदतीला – सविस्तर बातमी

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक पंकज जेबले, हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन तसेच विविध गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते.

यावेळी श्री. डूडी म्हणाले, गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदारांना गणना अर्ज देण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी स्वत: घरोघरी जाऊन गणना अर्ज वाटप केल्यानंतर बीएलओ ॲप वर अर्ज दिल्याची नोंद घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोसायट्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून एकत्रित गणना अर्ज न स्विकारता त्यांना सोसायटीतील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करावी. ॲपवर नोंद न झाल्यास संबंधितांचे नाव मतदार यादीत येणार नाही. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार संख्या आहे. जिल्ह्यात एकूण ८ हजार ४१७ मतदान केंद्र असून आजअखेर ९० लाख ८४ हजार ८८ इतकी मतदार संख्या आहे. आत्तापर्यंत ४५ लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.

ते पुढे म्हणाले, विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत २ कोटी ८४ लाख गणना फॉर्म छापून घेण्यात आले आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी गणना अर्ज वितरीत केल्यानंतर सोसायट्यांनी बैठका घेऊन अर्ज भरण्याबाबत मतदारांना माहिती द्यावी. या कार्यक्रमांतर्गत अधिकारी २९ जुलै पर्यंत घरोघरी भेटी देणार आहेत. एका मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे १४०० ते १८०० गणना अर्ज देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांना प्रत्येक घरी जाऊन मतदार संख्या तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोसायट्यांमध्ये बीएलओ आल्यानंतर सभागृहांमध्ये एकत्रित फॉर्म वाटप करण्यात येऊ नयेत. अर्ज प्रत्येक मतदाराला पोच केल्यानंतर दोन-तीन दिवसांत परत जमा करण्याचे नियोजन आहे.

कळसकर यांनी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या कार्यक्रमांतर्गत ८ ऑगस्ट रोजी तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करणे, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दावे आणि हरकती दाखल करणे, ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर- दाखल हरकतींवर सुनावण्या घेण्यात येणार आहेत. सुनावण्या घेण्याच्या कामासाठी ५४४ सहायक निवडणूक अधिकारी नेमण्यात आले असल्याचे श्रीमती कळसकर यांनी सांगितले.

विशेष सखोल कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमासाठी उपनिबंधक कार्यालयाकडून पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असे श्री.जेबले यांनी सांगितले.

सहकारी सोसायट्या नेहमीच सकारात्मक भूमिकेतून काम करत असतात. या प्रक्रियेतही सर्व गृहनिर्माण संस्थांनी निपक्षपणे सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पटवर्धन यांनी केले आहे.

यावेळी गृहनिर्माण संस्था प्रमुखांनी या कार्यक्रमाची समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी केल्यास मतदारांमध्ये जनजागृती होईल असे सुचविले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×