Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

एमआयडीसीच्यावतीने उद्योकपुरक वातारणनिर्मीतीवर भर

एमआयडीसीच्यावतीने उद्योकपुरक वातारणनिर्मीतीवर भर

उद्योजकांचे विविध विषय मार्गी लावण्याकरिता प्रयत्नशील-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील

marathinews24.com

बारामती – गुणवत्तापूर्व व पारदर्शक सेवेला प्राधान्य देत उद्योजकांचे विविध विषय मार्गी लावून त्यांचे समाधान होईल यादृष्टीने एमआयडीसी कामकाज करीत आहे, प्रत्येक विषयनिहाय कालमर्यादेत आढावा घेवून ते जलगतीने मार्गी लावण्यावर भर देण्यात येत आहे, उद्योजकांनी याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी केले.

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ नागरिकांची सुखरूप सुटका; एकाचा मृत्यू, आठ जणांचा शोध सुरू – सविस्तर बातमी

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्र सिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथील प्रादेशिक कार्यालयात उद्योजकांच्या विविध समस्याबाबत बैठक संपन्न झाली. यावेळी प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता विजय पेटकर, बारामती औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रमोद काकडे, बारामती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी, बारामती औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.

पाटील म्हणाले, एमआयडीसी ही विकास प्राधिकरण असून कामकाज करतांना गतीमानपद्धतीने कामकाज, सेवा देत असतांना किमान कागदपत्रे घेण्यासोबत त्यामध्ये टप्पे कमी कसे करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. एमआयडीसीचे कामकाज उद्योगपुरक होण्याकरिता व्यवसायानुकूलता (ईझ ऑफ डुईंग बिझिनेस) प्रमाणे कार्यवाही करावी.

एमआयडीसीमधील रस्ते, वीज, पाणीपुरवठा, कर्मचाऱ्यांच्या आरोग्य स्वच्छता आदीबाबींवर प्राधान्याने काम करीत वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालणे, उद्योगांमध्ये होणारे नवनवीन बदलाची अंमलबजावणी करावी, उद्योजकांना दर्जेदार व सुलभ सेवा देऊन बारामती एमआयडीसीने कामाच्या माध्यमातून राज्यात वेगळी ओळख निर्माण करुन नावलौकिक मिळवावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिल्या आहेत.

‘व्हिजिटर्स इन्व्हेस्टर्स इंडस्ट्रियल असोसिएशन’ यांच्या वेळोवेळी बैठका घेवून मार्गदर्शन करावे. प्रलंबित विषय सोडविण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात राहून काम करावे. एमआयडीसीच्या बैठकींना जिल्हाधिकारी तथा इतर महत्वाच्या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्रमांना आंमत्रित करावे, अशा सूचना अशाही सूचना दिल्या आहेत, त्याप्रमाणे एमआयडीसी कामकाज करीत असून उद्योजकांनीही त्यादृष्टीने कामकाज करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

पाटील यांनी बैठकीस आलेल्या सर्व संघटनांचे अध्यक्ष, प्रतिनिधी व उद्योजकांचे स्वागत करुन बैठकीस सुरुवात केली. यावेळी बारामती एमआयडीसी देशात अग्रेसर राहण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल, एमआयडीसीला सहकार्य करण्यात येईल, अशापद्धतीने उपस्थितांनी सहमती दर्शवली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×