Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदल

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे–पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल

पुणे-सोलापूर रस्ता, हडपसर – सासवड रस्ता वाहतुकीस बंद

marathinews24.com

पुणे – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी (११ जुलै) श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी सोहळा प्रस्थान सोहळ्यानिमित्त शनिवारी मध्यरात्री दोननंतर नाना-भवानी पेठेत वाहतूक बदल करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर – सविस्तर बातमी

‘पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गावर आल्यानंतर सोलापूर रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.पहाटेपासून पोलिसांकडून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथून प्रस्थान ठेवणार आहे. श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर येथून प्रस्थान ठेवणार आहे. दोन्ही पालख्या नाना भवानी पेठेतून लष्कर भागात येणार आहेत. तेथून पुणे-सोलापूर महामार्गाने हडपसर गाडीतळपर्यंत एकत्रित जाणार आहेत. गाडीतळ येथून सासवड रस्त्याने दिवे घाटमार्गे श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सासवड येथे रविवारी सायंकाळी मुक्कामी पोहोचणार आहे. श्री तुकाराम महाराज पालखी यांची हडपसर गाडीतळमार्गे पुणे-सोलापूर महामार्गावरुन लोणी काळभोर येथे मुक्कामी येणार आहे. मध्यरात्री दोननंतर टप्याटप्याने पालखी मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.

पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे

संत कबीर चौक ते बेलबाग चौक, संत कबीर चौक ते रामोशी गेट चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक) ते रामोशी गेट चौक, गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील चौक, मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान, बिशप स्कूल ते मम्मादेवी चाैक, वानवडी बाजार ते मम्मादेवी चौक, ट्रायलक हाॅटेल ते महात्मा गांधी रस्ता ते रामोशी गेट चौक, मोरओढा ते भैरोबा नाला चौक, भैरोबानाला चौक ते मम्मादेवी चौक, जांभुळकर चौक ते फातिमानगर चौक, सोलापूर रस्त्यावरील बी. टी. कवडे रस्ता चौक, काळूबाई मंदिर चौक, रामटेकडी, वैदुवाडी चौक, मगरपट्टा चौक, हडपसर गाव वेस (वाहतूक बंद मध्यरात्री दोन ते दुपारी दोन), सीरम चौक ते सोलापूर रस्ता, १५ नंबर फाटा ते सोलापूर रस्ता, मंतरवाडी फाटा ते सासवड, खडीमशीन चौक ते बोपदेव घाट (वाहतूक बंद पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत)

– पालखी प्रस्थान मार्गावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई

– पालखी प्रस्थानानंतर टप्याटप्याने वाहतूक पूर्ववत

– सासवडकडे जाणाऱ्या दिंडीतील वाहनांनी भैरोबा नाला, लुल्लानगर, कोंढवा, बोपदेव घाटाचा वापार करावा

– वाहतूक नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक – ०२०-२६६८५००० किंवा २६६८४०००

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×