Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला बेड्या; हडपसर पोलिसांची कारवाई

१० कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणात रिलस्टारला बेड्या

७.३० लाखांचे सोन्याचे दागिने गेले होते चोरी

marathinews24.com

पुणे – घरकामाच्या निमित्ताने घरात ये-जा करणाऱ्या मोलकरणीनेच मालकिणीचा विश्वासघात करत तब्बल ७.३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना हडपसर परिसरात उघडकीस आली आहे. हडपसर पोलिसांनी कसून तपास करून अंबिका सदाशिव खडगेकर (वय ३८, रा. साडेसतरा नळी, हडपसर, पुणे) हिला अटक केली आहे. तिच्‍याकडून चोरी गेलेले सर्व दागिने जप्‍त करण्यात आले आहे.

बसची वाट पाहणाऱ्या महिलेची सोनखाखळी चोरणाऱ्याला बेड्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जुलै २०२६ रोजी फिर्यादी यांच्या घरातील मास्टर बेडरूममध्ये ठेवलेल्या बॅगेतून ७ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार हडपसर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान घराचे कुलूप किंवा कपाट तोडल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत.

त्यामुळे घरात नियमित येणाऱ्या व्यक्तीवर संशय घेत तपासाची सूत्रे वेगाने फिरविण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड आणि तपास पथकाने घरात काम करणारी अंबिका खडगेकर हिची चौकशी केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर पैशांची गरज असल्याने आपणच दागिने चोरल्याची कबुली तिने दिली.

आरोपीकडून १५.५५० ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी, ९.५५० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि १५.८०० ग्रॅम वजनाची रंगीबेरंगी मण्यांची सोन्याची चेन असा एकूण ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील व पोलीस हवालदार निलेश किरवे करीत आहेत.

ही कारवाई पोलिस उपायुक्त (परिमंडळ ६) जीवन बेनिवाल, सहाय्यक पोलिस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार दीपक कांबळे, निलेश किरवे, बापू लोणकर, भाऊसाहेब कटके, अजित मदने, कुंडलिक केसकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार, आकाश धावडे, विजय कानेकर, धीरज शेलार, महावीर लोंढे आणि शितल खळदकर यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×