Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मोबाइल हिसकावणार्‍याला बेड्या, ३ गुन्हे उघडकीस

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – नागरिकांचे मोबाइल हिसकावून नेणार्‍या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणून दुचाकीसह २ लाख ३७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आकाश सुरेश वाघिरे (वय २१ रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तरूणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार हे १० जुलैला सकाळी संचेती चौकात थांबून कॅब बुक करीत होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्याकडील १ लाख ३७ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला.

पुण्यात नातेवाईकांकडून जावयांची धुलाई – सविस्तर बातमी

जबददस्तीने मोबाइल हिसकावून नेण्याचा गुन्हा दाखल शिवाजीनगर ठाण्यात करण्यात आला होता. संबंधित आरोपी दुचाकीसह वेताळबाबा चौकात येणार असल्याची माहिती पोलीस अमलदार महावीर वलटे, दीपक रोमाडे यांना मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून आकाश वाघिरे याला अटक केली. ही कामगिरी उपायुक्त कृषीकेश रावले, एसीपी अनुजा देशमाने, वरिष्ठ निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, एपीआय संतोष पाटील, भाउ चव्हाण, राजकिरण पवार, इसाक पठाण, सचिन जाधव, श्रीकृष्ण सांगवे, श्रीकांत मखरे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×