बिबवेवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – सासरकडील नातेवाईकांकडून जावयांना मारहाण करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. मारहाण प्रकरणी बिबवेवाडी आणि कोंढवा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या घटनेत बिबवेवाडी भागात पत्नीच्या घरी मोबाइल आणण्यासाठी गेलेल्या जावयाला मारहाण केल्याची घटना घडली.
माउलींच्या पालखी सोहळ्यात ट्रकच्या धडकेत ३ वारकरी महिलांचा मृत्यू – सविस्तर बातमी
बिबवेवाडी पोलिसांनी सासू, पत्नी, तसेच नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत जावयाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ३८ वर्षीय जावई रविवारी (दि. १२) दुपारी अडीचच्या सुमारास पत्नीच्या माहेरी मोबाइल आणण्यासाठी गेला होता. त्याने पत्नीला मोबाइल देण्यास सांगतिल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. पत्नी, सासू, तसेच नातेवाईकांनी तक्रारदार जावयाला धोपाटणे, स्टम्पने मारहाण केली. हवालदार कर्चे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मारहाणीत जावयाचे नाक मोडले
पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरकडील नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना ११ जुलैल कोंढवा परिसरात घडली आहे. मेहुण्याने नाकावर ठोसा मारल्याने जावयाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे ११ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कोंढव्यातील मीठानगर परिसरात माहेरी गेलेली पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर तक्रारदार जावई तेथून घरी जात असताना मेहुण्याने तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शिवीगाळ केल्यानंतर मेहुण्याला जाब विचारण्यासाठी तक्रारदार पुन्हा तेथे गेला. तेव्हा सासरकडील नातेवाईकांनी त्याला मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक खोपडे तपास करत आहेत.
पत्नीला केली पट्टयाने मारहाण
कौटुंबिक वादातून पत्नीला पट्टयाने मारहाण करणार्या एकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचा आरोपी पती चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ करत होता. १० जुलैला त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी त्याने पत्नीला चामड्याच्या पट्टयाने मारहाण केली. पोलीस हवालदार भोसले तपास करत आहेत.
























