Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पुणे महापालिकेचा कर कमी करुन देण्याची बतावणी करून फसवणूक

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोेटींची फसवणूक

व्यावसायिकाची ६ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – महापालिकेचा कर कमी करुन देण्याची बतावणी करुन व्यावसायिकाची ६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत व्यावसायिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी राजेंद्र हनुमंत पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आहेत. आरोपींशी त्यांची ओळख झाली होती. महापालिकेच्या कर आकारणी विभागातील उपायुक्तांचा पुतण्या असल्याची बतावणी आरोपीने केली होती. मिळकत कर कमी करुन देण्याची बतावणी करुन आरोपीने त्यांच्याकडून वेळोवेळी ६ लाख रुपये रोख स्वरुपात घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक काठे तपास करत आहेत.

पोलद व्यावसायिकाची फसवणूक

पोलद व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी ४ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका पोलाद व्यावसायिकाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ६२ वर्षीय पोलाद व्यावसायिक हे मार्केटयार्ड भागात राहायला आहे.

पोलाद विक्रीसाठी त्याने ऑनलाइन जाहिरात त्यांनी प्रसारित केली होती. सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तक्रारदार व्यावसायिकाला पोलाद खरेदीबाबत चोरट्यांनी विचारणा केली. त्यानंतर पोलाद खरेदी करण्याची बतावणी करुन त्यांच्याकडून वेळोवेळी ४ लाख ४४ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने खात्यात जमा करुन घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुनीता नवले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×