Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पुण्यात मंडप उतरविताना विजेच्या धक्क्याने अल्पवयीनाचा मृत्यू

पुण्यात देवीच्या मिरवणूकीत रथाला बसला करंट

मंडप व्यावसायिका विरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मंडप उतरविताना मंडप व्यावसायिकाकडे काम करणारा अल्पवयीन विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्ता भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी मंडप व्यावसायिकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यश प्रितियानी (वय १६) असे मृत्यमुुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत यशचे मामा धनंजय कृष्णा मापुसकर (वय ४९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंडप व्यावसायिक आसीफ कासम सय्यद (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघोलीत डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडीवाला रस्त्यावरील मारुती मंदिराजवळ एका विवाह समारंभानिमित्त हळदीचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. मंडप व्यवासायिकाकडे यश प्रितियानी हा काम करत होता. तो अल्पवयीन असताना त्याच्याकडून धोकादायक पद्धतीने काम करुन घेतले जात होते. ३ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास मंडप उतरवित असताना यशला विजेचा धक्का बसला. यश बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक चौगुले तपास करत आहेत. यश अल्पवयीन असताना त्याच्याकडून काम करुन घेतले जात होते. मंडप व्यावसायिकाने सुरक्षेविषयी पुरेशी काळजी घेतली नव्हती. मंडप व्यवासायिकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचे यशचे मामा मापुसकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×