Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

गुरुपौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

१९ ते २९ जुलैदरम्यान भाविकांसाठी विविध उपक्रम; दिवसभर प्रसाद वाटपाची व्यवस्था

marathinews24.com

पुणे – गुरुपौर्णिमेनिमित्त लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ ते २९ जुलै या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक उपक्रम पार पडणार असून, भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्याच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य; क्वांटम टेक्नॉलॉजी मिशनला शासनाचे पूर्ण सहकार्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील – सविस्तर बातमी

गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळच्या सत्रात धार्मिक विधी व पूजा-अर्चा, दुपारच्या सत्रात भजनाचा कार्यक्रम तसेच सायंकाळी भक्तिगीते व भावगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच मंदिरात दिवसभर भाविकांसाठी प्रसाद वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. या उत्सवाच्या काळात विविध क्षेत्रांतील मान्यवर मंदिरास भेट देणार असून, भाविकांना आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे.

याबाबत माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी सांगितले, “गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भाविकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेष आखणी करण्यात आली असून, सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.”

यावेळी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, खजिनदार ॲड. सूरज थोरात, विश्वस्त वर्षा थोरवे, विश्वस्त डॉ. पराग काळकर, विश्वस्त महेंद्रशेठ गाडवे, उत्सव प्रमुख नितीन पंडित तसेच उप-उत्सव प्रमुख मनीषाताई खेडेकर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×