Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

वादातूनच दिली होती खूनाची सुपारी, ६ जणांना बेड्या

वादातूनच दिली होती खूनाची सुपारी, ६ जणांना बेड्या

कोथरूड व्यावसायिकावरील हल्ला प्रकरण

marathinews24.com

पुणे – वादामुळेच मोबाइल शॉपी व्यावसायिकाच्या खूनाची सुपारी दिल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी खंडणी विरोधी पथक एकने ६ जणांना अटक केली आहे. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. ही घटना १४ जुलैला संध्याकाळी सातच्या सुमारास कोथरूडमध्ये घडली होती.

पुण्यात केशवनगरात वाहनांची तोडफोड – सविस्तर बातमी 

सिद्धेश नितीन धुमाळ (वय २५, रा. घोरपडे पेठ) नागेश उर्फ लाडू राजू मानिके (वय १९ रा. विश्रांतवाडी) राज तुषार धुमाळ (वय १९ रा. एरंडवणे) प्रसाद सुभाष मारणे (वय ३१, रा. कोथरूड) आदित्य अश्विनी कुमार डाके (वय २८, रा. कोथरूड) मेघराज ज्ञानेश्वर बारंगळे (वय ३५ रा. नर्‍हे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमित शिंदे वय ३५ असे गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

अमित शिंदे मोबाइल शॉपी व्यावसायिक असून, १४ जुलैला संध्याकाळी कोथरूड परिसरात त्यांच्यावर टोळक्याने कोयत्याने हल्ला केला होता. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अमलदार सोमनाथ कांबळे आणि रहिम शेख यांना आरोपी सिद्धेश धुमाळ घोरपडे पेठेत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एपीआय प्रसन्न जर्‍हाड यांच्या पथकाने सापळा रचून धुमाळला शिताफीने पकडले.

त्याच्याकडील चौकशीत आणखी दोघांना अटक करीत दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपी मारणे, डाके, बारंगळे यांची तक्रारदार शिंदे सोबत वाद झाले होते. त्यानंतर संबंधितांनी शिंदेच्या खूनाची सुपारी दिल्याचे उघडकीस आले. ही कामगिरी उपायुक्त गौहर हसन, एसीपी शैलेश संखे, पोलीस निरीक्षक महेश सागडे, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, एपीआय नानासाहेब कदम, सयाजी चव्हाण, मयूर भोकरे, किशोर शिंदे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×