जीवे मारण्याची दिली धमकी
marathinews24.com
पुणे – शहरातील ९ वर्षाच्या दोन चिमुरडींसोबत तरुणांनी अश्लील चाळे करुन त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. घडलेला प्रकार पिडित मुलीने कुटुंबियांना सांगितल्यानंतर पीडितेच्या आईने संबंधित पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पहिल्या घटनेत पीडित मुलीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार राहुल राम कुमार (वय २१,रा. धनकवडी) याच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २ ते ३ मे कालावधीत घडली आहे.
दुचाकीस्वार तरूणाला दमदाटी, ५० हजारांची सोन्याची चैन हिसकावली – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल कुमार हा पिडित मुलीच्या घराजवळ राहायला आहे. २ ते ३ मे कालावधीत त्याने पिडित मुलीचा पाठलाग केला. मुलगी घरी एकटी असताना तिच्या सोबत आरोपीने अश्लील चाळे केले. झालेला प्रकार कोणाला सांगू नको असा दबाव टाकत, घडलेला प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस काळे पुढील तपास करत आहे.
कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग
कोंढवा परिसरात राहणार्या ९ वर्षीय मुलीवर तरूणाने अत्याचार केला आहे. साहिल अन्वर शेख (रा.कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याने पीडित मुलीचे तोंड दाबून बाथरुममध्ये बळजबरीने ओढून नेले. त्यानंतर दरवाजा लावून मुलीवर अतिप्रसंग केला. ही गोष्ट कोणाला सांगू नको, नाहीतर तुला मी जीवे ठार मारुन टाकेन अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. दरम्यान, मुलीने तिच्या आईकडे जाऊन तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
लग्नाचे अमिषाने तरुणीवर बलात्कार
लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर ओळखीतील मित्रानेच बलात्कार केला आहे. मित्राने तिला प्रेमाच्या जाळयात ओढून तिचा विश्वास संपादन केला. तुझ्यासोबतच लवकर लग्न करणार असल्याचे सांगत त्याने तिच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणाने तिच्याशी लग्न करु शकत नाही असे बोलून भांडणे करुन तिला शिवीगाळ केली. याप्रकरणी पिडित तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी रवी राजकुमार कस्तुरे (वय २५,रा.खराडी) याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.