Breking News
पुण्यातील अनेकांची बँकखाती पोलिसांच्या रडारवरपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा मानकरी ठरला मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगेकृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देशी गोवंश प्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटनदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण मोहीमेअंतर्गत साडेसात हजार वृक्ष लागवडीचा संकल्पराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा २३ व २४ जुलै रोजी पुणे दौरावाहने चोरणारा अल्पवयीन ताब्यात, ४ गाड्या जप्तबिटवाईज–मर्सिडीज बेंझ परिसरात उड्डाणपुलाची मागणीAjit Pawar : कष्टकर्‍यांच्या वेदनेने कळवळणारा पहाड..!दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादनविवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला महाराष्ट्र बंदची हाक

marathinews24.com

मुंबई – दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ येत्या 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव – सविस्तर बातमी 

यावेळी बोलताना ॲड. आंबेडकर यांनी NEET परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पहिली परीक्षा चुकीच्या पद्धतीने पार पडली असून, फेरपरीक्षेतही अनेक त्रुटी समोर आल्याचा दावा त्यांनी केला. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय असून, सरकारच्या भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे ते म्हणाले. या धोरणाविरोधात देशभर जन आंदोलन उभे राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करताना त्यांनी केंद्र सरकारवर हुकूमशाहीची भूमिका स्वीकारल्याचा आरोप केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजप लोकशाहीपेक्षा दडपशाहीवर विश्वास ठेवतात, अशी टीकाही त्यांनी केली. संसदेत आवाज उठविण्याबरोबरच रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी सर्व विरोधी पक्षांना केले.

विद्यार्थ्यांवरील लाठीमारामुळे जनतेमध्ये मोठा संताप असल्याचे सांगत, महाराष्ट्रातील विविध जिल्हास्तरीय आणि प्रादेशिक संघटनांशी चर्चा करून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपसोबत जाण्याची भूमिका नसलेल्या सर्व राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी आणि नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

हा बंद पूर्णपणे शांततापूर्ण असेल. कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ दिली जाणार नाही आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बंद शांततेत पार पाडला जाईल, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×