काळेपडळ पोलिसांची कामगिरी
marathinees24.com
पुणे – शहरातील विविध भागातून दुचाकी, रिक्षा, मोबाइल चोरणार्या अल्पवयीन चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ३ दुचाकी, रिक्षा, मोबाइल असा ४ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याने काळेपडळ, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
विवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू होता. त्यावेळी पोलीस अमलदार शाहिद शेख आणि अतुल पंधरकर यांना दुचाकी चोरटा उंड्री परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अल्पवयीनाला ताब्यात घेउन वाहने जप्त केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, एपीआय अमित शेटे, राजस शेख, प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, नीलेश देसाई, दाउद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन ढोले यांनी केली.






















