Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

पुण्यातील अनेकांची बँकखाती पोलिसांच्या रडारवर

Market Yard Pune Theft

फसवणूकीतील रक्कम घेण्यासाठी वापरली बँकखाती

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी शक्कल लढवित बँक खातेधारकांना आमिष दाखवून त्यांचे अकाउंट वापरण्यास घेत लाखो रूपयांचे गैरव्यवहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याबदल्यात संबंधितांना काही रक्कम देण्यात आली होती. संबंधित डेटा इंडिया सायबर कॉपरेशन सेंटर दिल्लीने पुणे सायबर विभागाला वर्ग केला आहे. त्यानुसार आता त्या बँक खातेधारकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

वाहने चोरणारा अल्पवयीन ताब्यात, ४ गाड्या जप्त – सविस्तर बातमी

सायबर चोरट्यांनी मिळवलेली रक्कम स्वतःच्या बँकखात्यात न घेता, इतरांच्या बँकखात्यात वर्ग केली आहे. त्यांना काही रक्कम देउन पुन्हा संबंधित रक्कम आपल्या खात्यात जमा करून घेतली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातील विविध पोलीस ठाण्यातंर्गत बँकखातेधारकांनी अशा प्रकारे लाखो रूपयांचे व्यवहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे संबंधितांविरूद्ध आता गुन्हे दाखल करण्यात येत असून, दरदिवशी बँकखातेधारकांविरूद्ध कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे.

चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडियन बँक खातेधारकाने बँकखाते सुरू केले होते. त्याचा वापर सायबर चोरट्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे. कनार्टकातील सायबर फसवणूकीतील २० लाख ४६ हजारांचा अपहार यामध्ये करण्यात आला आहे. तर मुंढव्यातही अशाच पद्धतीने एस बँक खातेधारकाने अकाउंट उघडले होते. त्याद्वार आर्थिंक व्यवहार करून देशातील १२ नागरिकांची ११ लाख ३५ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करीत आहेत.

फायनान्सच्या बँकखात्याचा गैरवापर केला

एयू स्मॉल फायनान्स बँक खातेधारकाने अकाउंट उघडून ते बँकखाते संघटित सायबर गुन्हेगारी करणार्‍या टोळीस वापरण्यास दिले होते. सायबर फसवणूकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी त्या बँकखात्याचा वापर करण्यात आला आहे. त्याद्वारे देशातील ५ नागरिकांकडील सायबर फसवणूकीतील २ कोटी ६६ लाख ५५ हजारांची रकमेचा व्यवहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×