Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

सराईत दोन किलोमीटर पळाला, बिल्डींगवरही लपला

सराईत दोन किलोमीटर पळाला, बिल्डींगवरही लपला

पोलिसांनी केले अटक, ४ गुन्हे उघडकीस

marathinews24.com

पुणे – घरफोडीसह वाहन चोरी करणार्‍या सराईताला कोंढवा बुद्रूक येवलेवाडी पोलिसांनी तब्बल २ किलोमीटरचा पाठलाग करून अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीचे दोन आणि वाहन चोरी, शरीराविरूद्धचा मिळून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्यातील २ लाख ९० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. मह्या उर्फ महेश काशिनाथ चव्हाण (वय २१ रा. गाडीतळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पुण्यातील अनेकांची बँकखाती पोलिसांच्या रडारवर – सविस्तर बातमी 

कोंढव्यातील टिळेकरनगरात तिघाजणांनी घरफोडी करीत ४ लाख ७० हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, संबंधित गुन्हा सराईत महेश चव्हाण याने केल्याचे स्पष्ट झाले. तो १७ जुलैला गोकुळनगरात कोणालातरी भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती अमलदार अभिजीत जाधव, विजय खेंगरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्याची तयारी केली. आरोपी महेश चव्हाण हा रिक्षातून खाली उतरल्यानंतर पोलिसांनी झडप घालून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने धक्का देउन पळ काढला.

तो २ किलोमीटर पळाला, बिल्डींगवरही लपला

पोलिसांना धक्का दिल्यानंतर सराईत चव्हाण हा २ किलोमीटर पळत होता. गर्दीतून वाट काढून तो बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर जाउन लपून बसला. पोलीस त्याठिकाणी गेले असता, त्याने पुन्हा इमारतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने टिळेकरनगरातील सारंगी हाईटसमध्ये साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारूती पाटील, पोलीस निरीक्षक दीपक कारंडे, उपनिरीक्षक आकाश विटे, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर, विजय खेंगरे, अनिल बनकर, किशोर पवार, रूपेश पाटील, लक्ष्मण होळकर, मयूर मोरे, सुजित मदन यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×