शेतकऱ्यांसाठी खुशखबर…जिल्ह्यातील ५३८ पाणंद, शिव रस्ते वापरास खुले-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

अतिक्रमित बंद झालेले पाणंद, शिव रस्ते खुले करण्यासाठी ३१ मे पर्यंत अर्ज करावे- जिल्हाधिकारी

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यात अतिक्रमित व बंद असलेले पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्यासाठी जानेवारी २०२५ पासून मोहीम हाती घेण्यात असून माहे एप्रिल २०२५ अखेर एकूण ७०४ कि.मी. लांबीचे ५३८ रस्ते वापरास खुले करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील गाव नकाशेप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले पाणंद, शिव रस्ते खुले करुन घेण्याकरीता नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे 31 मे पर्यंत अर्ज करावे, अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.

बारामती – चारचाकी वाहनासाठी ‘एमएच ४२ बीएस’ क्रमांकाची नवीन मालिका – सविस्तर बातमी 

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २५ एप्रिल रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणंद, शिव रस्ते लवकरात लवकर अतिक्रमण मुक्त व बंद असल्यास ते वापरास खुले करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यानुसार पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. तहसिलदारांकडे यापूर्वी रस्ते खुले करण्याबाबत प्राप्त अर्जानुसार रस्ते खुले करण्याची कार्यवाही करावी.

भुमीअभिलेख विभागाकडून ग्राम महसूल अधिकारी यांनी ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग याबाबत गाव नकाशे ८ मे अखेर प्राप्त करून घ्यावेत. ग्राम महसूल अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या गाव नकाशात दर्शविल्याप्रमाणे गाडी मार्ग, पायमार्गाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अतिक्रमित व बंद असलेल्या रस्त्यांची यादी तयार करुन त्याप्रमाणे संबंधित भोगवटाधारकांची यादी ९ ते १५ मे या कालावधीत तयार करावी. संबंधित भोगवटाधारक, सहधारक व सरपंच यांची एकत्रित बैठक घेऊन रस्ता खुला करण्याबाबत १३ ते २३ मे कालावधीत प्रयत्न करावे.

यापद्धतीने कार्यवाही करुनही रस्ता खुला झाला नसल्यास तहसिलदारांनी प्राधान्यक्रमाने रस्ता खुला करण्याबाबतची यादी दिनांक २२ ते ३० मे या कालवधीत तयार करावी. या यादीनुसार भुमीअभिलेख विभागामार्फत महिन्याच्या प्रत्येक बुधवारी प्राधान्यक्रमाने मोजणी करुन घ्यावी. शेवटी रस्ता खुला करण्याबाबत भुमीअभिलेख व पोलीस विभागाच्या मदतीने रस्ता खुला करावा.

तहसीलदारांकडून प्राप्त होणाऱ्या यादीप्रमाणे रस्त्यांची मोजणी ही संबंधित उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी मोफत करावी. याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पुणे यांना सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते खुले करतांना कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलीस बंदोबस्त आवश्यक पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षकामार्फत मोफत पोलीस बंदोबस्त पुरवावा. रस्ते वापरास खुले केल्यानंतर त्यांच्या मजबुतीकरणासाठी गट विकास अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना डुडी यांनी दिल्या आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top