Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

खाकीचा सर्जिकल स्ट्राईक; स्कॉर्पिओतून चोऱ्यांचा थरार रचणारी टोळी गजाआड

Beed Inter District Theft Gang Arrest

स्कॉर्पिओतून शेळीचोरी व कॉपर वायर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा बीड एलसीबीने केला पर्दाफाश

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – स्कॉर्पिओ गाडीतून यायचे, आखाड्यावर झोपलेल्या शेतकऱ्यांना बेदम मारहाण करून शेळ्या लांबवायच्या आणि सोलार-कॉपर प्लांटवर दरोडा टाकून रातोरात पसार व्हायचे… बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत दहशत पसरवणाऱ्या या आंतरजिल्हा टोळीचा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत फिल्मी आणि थरारक शैलीत पाठलाग करून पर्दाफाश केला आहे.

डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ९४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

केज परिसरातील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना, एलसीबीचे उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकाला पक्की खबर मिळाली की, धारूरमधून रात्रीच्या वेळी १२ शेळ्या चोरणारा आणि केजमधून कॉपर वायर लांबवणारा अट्टल चोरटा प्रकाश उर्फ गुड्या काळे (रा. मोहा, ता. कळंब) हा पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीने (एमएच १२ एचएफ ४२४५) पुन्हा चोरीचा माल विकण्यासाठी कळंबच्या दिशेने निघाला आहे. माहिती मिळताच एलसीबीचे पथक क्षणाचाही विलंब न लावता मोहा गावाच्या दिशेने रवाना झाले. बुधवारी (ता.२२) दुपारी दोनच्या सुमारास मोहा रस्त्यावरील हॉटेल कुलस्वामिनीजवळ पोलिसांचे पथक दबा धरून बसले. काही वेळातच वेगाने येणारी तीच पांढरी स्कॉर्पिओ दिसताच पोलिसांनी आपली वाहने आडवी घालून तिला चारही बाजूंनी वेढा घातला. गाडीभोवती खाकीचा गराडा पडल्याचे पाहताच गाडीत बसलेल्या सहा भामट्यांचे धाबे दणाणले. गाडीतील दोघांनी पोलिसांना जोराचा धक्का देऊन झाडीचा फायदा घेत पळ काढला.

मात्र, उपनिरीक्षक विघ्ने आणि त्यांच्या पथकाने प्रसंगावधान राखत जीवावर उदार होऊन मुख्य प्रकाश उर्फ गुड्या शाहाजी काळे याच्यासह शहाजी शेषराव पवार, संतोष बारीकराव शिंदे आणि दिनेश नागनाथ काळे (सर्व रा. मोहा पारधी वस्ती व कुरणेनगर, ता. जि. धाराशिव) चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी, हत्यारे आणि मुद्देमालासह एकूण ६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धारूर, नेकनूर आणि केज पोलीस ठाण्यांतील ४ गंभीर गुन्हे यामुळे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख पोलीस निरीक्षक शिवाजी बटेवाड, उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस अंमलदार घोडके, जफर पठाण, दिलीप गित्ते, भागवत शेलार, दीपक खांडेकर, अर्जुन यादव, मुंडे, अश्वीनकुमार सुरवसे आणि गणेश मराडे यांच्या पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×