Breking News
Pune Senior Citizen Pension Fraud : ज्येष्ठ महिलेची ७ लाखांची फसवणूकPune Post Office Theft Attempt : रास्ता पेठेतील टपाल कार्यालयात चोरीचा प्रयत्नPune Mahalakshmi Temple Gold Saree : सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीMakarand Anaspure : विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ- मकरंद अनासपुरेMLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे स्टेशन बसस्थानकातील सुविधांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी

पुणे स्टेशन बसस्थानकातील सुविधांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी

स्वच्छता हा प्रवाशांचा मूलभूत अधिकार; हयगय खपवून घेणार नाही – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज पुणे स्टेशन बसस्थानकाला भेट देऊन विविध सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.

एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश – सविस्तर बातमी 

यावेळी मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील हिरकणी कक्ष, पानपोई, प्रसाधनगृह तसेच प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या अन्य मूलभूत सुविधांची पाहणी केली. पाहणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि त्या तातडीने दूर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

बसस्थानकाची स्वच्छता, प्रसाधनगृहांची स्वच्छता व देखभाल, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच महिला प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना विशेष सूचना केल्या.

यावेळी मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील काही प्रवाशांशी थेट संवाद साधत एसटीच्या बससेवेबाबत त्यांचे अनुभव जाणून घेतले. प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, बससेवेची गुणवत्ता आणि उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी प्रवाशांकडून थेट अभिप्राय घेतला.

“एसटी ही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रवाशांना चांगली बससेवा देण्याबरोबरच त्यांना स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. स्वच्छता हा प्रवाशांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हयगय अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा निर्वाणीचा इशारा मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

प्रवाशांच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत बसस्थानकांची नियमित पाहणी करून त्रुटींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×