Breking News
Pune Mahalakshmi Temple Gold Saree : सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीMakarand Anaspure : विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ- मकरंद अनासपुरेMLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणका

येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

राज्याचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते ध्वजारोहण

marathinews24.com

पुणे – भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे राज्याचे अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह व सुधारसेवेचे महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक, अधिकारी, कर्मचारी व कारागृह मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण – सविस्तर बातमी 

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन श्री. वारके यांनी कर्तव्यनिष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पित सेवाभाव हीच राष्ट्रसेवेची खरी ओळख असून, प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने पार पाडाव्यात, असे आवाहन केले.

कारागृह व सुधारसेवा विभागामार्फत राज्यातील कारागृहांची सुरक्षितता व शिस्त कायम राखण्याबरोबरच बंदींच्या सुधारणा व पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बंदींच्या पुनर्वसनासोबतच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि कारागृह व सुधारसेवा विभागाच्या उद्दिष्टांप्रती आपली बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प केला.

यावेळी महाराष्ट्र कारागृह विभागातील उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त सुभेदार संजीव सखाराम घाणेकर, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे हवालदार संजय सखाराम तलावरे, भायखळा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विकास हनुमंत रजनळकर,येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे हवालदार महेश लक्ष्मण गडनाईक यांना पुष्पगुच्छ व प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले. पदक प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी कौतुक केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×