Breking News
बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेशपुण्यात एमडी तस्करीच्या तयारीतील दोघांना अटकचाकण परिसराची कचराकोंडी फुटली; ३६.५ एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्पप्रतिगामी शक्तींच्या विरोधात पेटून उठण्याची गरज: उल्हास पवारट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठारजेष्ठाच्या मोबाइलचा ताबा घेउन ४ लाखांचा गंडाइमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून दोघे कामगार ठारजलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन-रन फॉर वॉटर ’साठी प्रशासन सज्जपुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ६७ लाखांची फसवणूक‘धर्मस्वातंत्र्य’ कायदा लागू होण्यापूर्वी पुणे पोलिसांकडून कारवाईची घाई ?

सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहन

सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहन

महिला व बालविकास विभागाचे उप आयुक्त जे. बी. गिरासे यांनी केले आवाहन

marathinews24.com

पुणे – मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजने (SSY) मध्ये पालकांनी आपल्या पात्र मुलींची खाती उघडावीत, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे उप आयुक्त जे. बी. गिरासे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेत-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

पुणे विभागात या योजनेअंतर्गत सुमारे ८ लाख मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत दहा वर्षांखालील मुलींसाठी पालक किंवा कायदेशीर पालकांच्या नावाने खाते उघडता येते. या योजनेत दरवर्षी किमान २५० रुपये ते कमाल १ लाख ५० हजारापर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या वार्षिक ८.२ टक्के व्याजदर असून, योजनेची परिपक्वता २१ वर्षांनी होते. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी नियमानुसार खात्यातील ५० टक्के रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि शालेय शिक्षकांच्या माध्यमातून योजनेचा अधिकाधिक प्रसार करून पात्र मुलींची १०० टक्के नोंदणी करण्याचे उद्दिष्ट टपाल विभागाने ठेवले आहे. पालकांनी अधिक माहितीसाठी टपाल कार्यालयातील अधीक्षक समीर महाजन- ८४४८३२९८४४, नितीन येवला- ८८३०७०५५४१, दिलीप सर्जेराव- ९७६६०७७९९६, केतन शित्रे, बारामती -९२७०५३२३९४, अविनाश पाखरे- ८७८८३२३२१८ यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गिरासे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×