Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पोलिसांवर हल्ला करुन पसार झालेले चोरटे जेरबंद

पोलिसांवर हल्ला करुन पसार झालेले चोरटे जेरबंद

छत्रपती संभाजीनगरातील जंगलातून दोघांना अटक

marathinews24.com

पुणे – विधी महाविद्यालय रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला करुन पसार झालेल्या चोरट्यांना छत्रपती संभाजीनगर परिसरातून गुन्हे शाखेेने अटक केली. शाहरूख कदीर खान पठाण (वय २८), फारुख कदीर खान पठाण (वय २६, दोघे रा. जंजाळा, अजिंठा, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील बंगल्यावर दरोडा घालण्याच्या तयारीत आरोपी पठाण आणि साथीदार होते. त्यावेळी रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या अंधारात लपलेल्या चोरट्यांना पाहिले.

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

गस्त घालणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. गोळीबारात एका चोरट्याच्या पायाला गोळी चाटून गेली. चोरटे अंधारात पसार झाले. पोलिसांनी तपास करुन पठाण यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पकडले.

गु्न्हा दाखल केल्यानंतर आरोपी पठाण हे पसार झाले होते. पसार झालेले चोरटे जंजाळ परिसरातील जंगलात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेने पठाण यांना ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, संदीपान पवार, उपनिरीक्षक अभिजित पवार, दत्तात्रय काटम, संदीप जाधव, शहाजी काळे, प्रताप गायकवाड, अकबर शेख, राहुल ढमढेरे, उमाकांत स्वामी, अमर चव्हाण, परमेश्वर कदम, नासेर देशमुख यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×