Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक

बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

पेट्रोल पंप सुरू करण्याचे आश्वासन देत व्यावसायिकाला घातला गंडा

marathinews24.com

पुणे – पेट्रोल पंप व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची दोन कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भूषण प्रभाकर वास्ते (वय ३५, रा. करकम, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कात्रज परिसरात राहायला आहेत.

कच्चे तेल व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष; पावणेतीन कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये आरोपीची तक्रारदार व्यावसायिकाची ओळख झाली होती. आरोपीने व्यावसायिकाला पेट्रोल पंप भागीदारीत सुरू करण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर आरोपीने त्यांच्याकडून दोन कोटी २९ लाख रुपये घेतले. पेट्रोल पंपाच्या नावे सुरू असलेल्या एका बँक खात्यात व्यावसायिकाने वेळोवेळी पैसे जमा केले. आराेपीने पेट्रोल पंप सुरू केला नाही. व्यावसायिकाने पैशांबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×