Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

वडिलांना मारहाण केल्याने तरुणाचा केला खून

Pune Crime News : भरदिवसा सहकारनगरमध्ये जेष्ठेचे मंगळसूत्र हिसकावले

मार्केटयार्ड भागातील घटना

marathinews24.com

पुणे – वडिलांना मारहाण केल्याच्या रागातून तरुणावर शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना मार्केट यार्ड भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. सतीश गुलाब शिरसाट (वय २५, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, मार्केट यार्ड) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सोनू अंकुश साठे (वय ३०, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, मार्केट यार्ड) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलीस कर्मचारी गौरव बदक यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश शिरसाट याने आरोपी गौरव साठे याच्या वडिलांना किरकोळ वादातून मारहाण केली होती. वडिलांना मारहाण केल्याने साठे त्याच्यावर चिडला होता. वडिलांना केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी त्याने शिरसाट याचा खून करण्याचे ठरविले.

२१ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील गल्ली क्रमांक तीन परिसरात संतोष साठे याच्या पत्र्याच्या खोलीजवळ आरोपी साठेने शिरसाट याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. साठे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पसार झालेला आरोपी साठे याला पोलिसांनी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक सुधीर कटारे तपास करत आहेत.

बिबवेवाडीत तरुणाचा खुनाचा प्रयत्न

बिबवेवाडी भागात वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. तरुणाचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. शुभम सोमनाथ कांबळे (वय ३०, रा. बिबवेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत कृष्णा भारत चौथमहाल (वय २८, रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रदीप पिंटू कश्यप (वय १९), मयूर रोहिदास चव्हाण (वय २०), शरद पिंटू चव्हाण (वय २१), तेजस सोमनाथ अंबुरे (वय २७, चौघे रा. बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम याचा काही दिवसांपूर्वी आरोपींशी वाद झाला होता. फिर्यादी कृष्णा चौथमहाल, त्याचा मित्र आणि मामेभाऊ शुभम हे २१ ऑगस्ट रोजी बिबवेवाडीतील स्मशानाभूमीजवळ रात्री साडेआठच्या सुमारास गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपी दुचाकीवरुन तेथे आले. त्यांनी शुभम याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यानंतर आरोपी पसार झाले. पसार झालेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×