Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

मांजरीत ट्रकच्या धडकेत २४ वर्षीय दुचाकीस्वार ठार; वाघोलीत दुचाकीच्या धडकेत ६५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुणे-सोलापूर महामार्गावरील मांजरी, तसेच अहिल्यानगर महामार्गावरील वाघोली परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. मांजरी भागातील महादेवनगर परिसरात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२२ ऑगस्ट) सकाळी नऊच्या सुमारास घडली. अमित रमेश अवताडे (वय २४, रा. लोणी काळभोर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालक चंद्रकांत महादेव काळे (वय ४२) याला अटक करण्यात आली. याबाबत गणेश ज्ञानेश्वर अवताडे (वय ३५, रा. मांजरी बुद्रुक) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात पीएमपी प्रवासी महिलांचे दागिने चोरले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अमित अवताडे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास मांजरीतील महादेवनगर भागातून निघाला होता. त्या वेळी भरधाव ट्रकने दुचाकीस्वार अमित याला धडक दिली. अपघातात गंभी जखमी झालेल्या अमित याला तातडीने रुग्मालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंभार तपास करत आहेत.

वाघोली परिसरात दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदाशिव नारायण भोजणे (वय ६५, रा. बकोरी रस्ता, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भोजणे यांची पत्नी अन्नपूर्णा (वय ६०) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव भोजणे हे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास वाघोलीतील भाडळे वस्ती परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या भोजणे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×