३५ लाख ४० हजारांचे साहित्य जप्त; थेउर ते कोलवडी नदीपात्रात सुरू होते वाळू उत्खनन
marathinews24.com
पुणे – अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्या सराईत गुन्हेगाराविरूद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेन कारवाईचा बडगा उगारला आहे. थेउर ते कोलवडी नदीपात्रात सुरू असलेले उत्खनन थांबवून ट्रॅक्टर, पोकलँड जप्त करीत तब्बल ३५ लाख ४० हजारांचे साहित्य ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ७ मे रोजी करण्यात आली आहे. पंकज सदाशिव गायकवाड (वय ३८ रा.भैरोबा वस्ती,कोलवडी ता.हवेली) असे कारवाई केलेल्या सराईताचे नाव आहे.
दारू पिण्याच्या वादातून तरुणावर वार; आंबेगावातील घटना – सविस्तर बातमी
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर ते कोलवडी गावातील मुळा मुठा नदीपात्रामध्ये अवैध वाळूउपसा सुरू असल्याची माहिती युनीट सहाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी धाव घेतली असता, कोलवडीत ट्रॅक्टर व पोकलॅण्ड दिसून आले. यावेळी आरोपी पंकज गायकवाड याला पकडण्यात आले. त्याठिकाणीवरील पोकलँड, दोन ट्रॅक्टर, ८ ब्रास वाळू असा ३५ लाख ४० हजारांचे साहित्य पथकाने जप्त केले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे,कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे,सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे,शेखर काटे,गणेश डोंगरे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.
पंकज गायकवाड सराईत गुन्हेगार
आरोपी पंकज गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध विविध पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हे दाखल आहेत. प्रामुख्याने कोंढवा, हडपसर, पौड, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या संबंधित गुन्हे दाखल आहेत. त्याला हडपसर ठाण्यातंर्गत दाखल गुन्ह्यात दोन वर्ष तडीपारही करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आले आहे. अवैधरित्या वाळू उपसा करताना त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे.